आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सानिया मिर्झा, पेसला अजिंक्यपदाची संधी!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सामन्यादरम्यान मार्टिना सानिया मिर्झा. - Divya Marathi
सामन्यादरम्यान मार्टिना सानिया मिर्झा.
लंडन - भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झाने अापली सहकारी मार्टिना हिंगीससाेबत विजयी माेहीम अबाधित ठेवली. या अव्वल मानांकित जाेडीने शुक्रवारी विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या फायनलमध्ये धडक मारली. अव्वल मानांकित सानिया-मार्टिनाने अवघ्या ५६ मिनिटांमध्ये फायनलचा प्रवेश निश्चित केला. या जाेडीने महिला दुहेरीच्या उपांत्य सामन्यात पाचव्या मानांकित काेप्स-जाॅन्स अाणि स्पियर्सचा पराभव केला. त्यांनी ६-१, ६-२ अशा फरकाने एकतर्फी विजयाची नाेंद केली. यासह त्यांनी अंतिम फेरी गाठली.

पेस-मार्टिनाअंतिम फेरी
भारताचालिएंडर पेस अाणि मार्टिना हिंगीसने मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली. या सातव्या मानांकित जाेडीने उपांत्य सामन्यात अव्वल मानांकित माइक ब्रायन अाणि बेथानी माटेकचा पराभव केला. पेस-मार्टिनाने तास १२ मिनिटांमध्ये ६-३, ६-४ अशा फरकाने सेमीफायनल जिंकली.

मार्टिनालादुहेरी मुकुटाची संधी
स्विसच्यामार्टिना हिंगीसला अाता दुहेरी मुकुटाची संधी अाहे. तिने एकाच दिवशी विजयाचा डबल धमाका उडवून अंतिम फेरी गाठली. तिने सानियासाेबत महिला दुहेरी अाणि लिएंडर पेससाेबत मिश्र दुहेरीच्या उपांत्य सामन्यात विजय मिळवला.

मरेचा पराभव
तिसऱ्यामानांकित अँडी मरेचा उपांत्य सामन्यात पराभव झाला. त्याला दुसऱ्या मानांकित राॅजर फेडररने धूळ चारली. त्याने तास मिनिटांत ७-५, ७-५, ६-४ ने सामना जिंकला.

याेकाेविक विजयी
नाेवाकयाेकाेविकने शुक्रवारी पुरुष एकेरीची अंतिम फेरी गाठली. त्याने उपांत्य सामन्यात २१ व्या मानांकित रिचर्ड गास्केटला ७-६, ६-४, ६-४ ने पराभूत केले. त्याने दाेन तास २१ मिनिटांत सामना जिंकला.

जेतेपदासाठी याेकाेविक-फेडरर झुंजणार
पुरुषएकेरीच्या जेतेपदासाठी जगातील नंबर वन नाेवाक याेकाेविक अाणि स्विस किंग राॅजर फेडर झंुजणार अाहे. या दाेघांमध्ये एकेरीची फायनल हाेईल. अजिंक्यपदावरचे अापले वर्चस्व अबाधित ठेवण्याच्या इराद्याने अव्वल मानांकित याेकाेविक काेर्टवर उतरेल. दुसरीकडे किताब जिंकून नव्याने इतिहास लिहिण्याचा फेडररचा प्रयत्न असेल.

बातम्या आणखी आहेत...