आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chand, 19, Had Been Banned Since Last Summer After Failing A Hormone Tes

पौरुषत्व चाचणीत ही ठरली होती पुरूष, बंदी हटल्‍याने आंतरराष्‍ट्रीय स्‍तरावर सहभाग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
द्युतीने 18 वर्ष वयोगटाखालील गटात एथलॅटिक्स चॅम्पियनशिपमध्‍ये 100 मीटर अंतर 11.8 सेकंदात पार करून सर्वांना आश्‍चर्याचा धक्‍का दिला होता. - Divya Marathi
द्युतीने 18 वर्ष वयोगटाखालील गटात एथलॅटिक्स चॅम्पियनशिपमध्‍ये 100 मीटर अंतर 11.8 सेकंदात पार करून सर्वांना आश्‍चर्याचा धक्‍का दिला होता.
भारतीय धावपटू द्युती चंद आंतरराष्‍ट्रीय स्‍तरावर पुनरागमन करणार आहे. आंतरराष्ट्रीय अॅथलॅटिक्स फेडरेशनने त्यांच्यावर लावलेली बंदी स्‍वित्‍झर्लंडच्‍या क्रीडा लवादाने (कॅस) दोन वर्षांसाठी मागे घेतली आहे. पौरुषत्व चाचणीनंतर द्युतीवर 2014 मध्‍ये बंदी लादण्यात आली होती. त्‍यामुळे राष्ट्रकुल व आशियाई क्रीडा स्‍पर्धेत ती सहभागी होऊ शकली नाही. द्युतीने 18 वर्ष वयोगटाखालील गटात राष्‍ट्रीय चॅम्‍पियनशीप जिंकली आहे.
बंदीचे कारण...
19 वर्षीय द्युतीच्‍या शरिरात पुरूष हार्मोन्सचे प्रमाण अधिक असल्‍याचे चाचणीत सिद्ध झाल्‍याने तिला भारताने राष्‍ट्रकुल स्‍पर्धेच्या महिला संघातून वगळले होते. त्‍यानंतर द्युतीने 'कॅस'कडे दाद मागितली. त्यावर 'कॅस'ने, '' जनुकीय कारणांमुळे काही महिलांच्‍या शरिरात पुरूष हार्मोन्‍सचे प्रमाण अधिक असू शकते. त्‍यामुळे अशा महिलेला पुरूष म्‍हणणे चुकीचे आहे. भविष्‍यात द्युतीविरोधात पुरावे मिळाले नाही, तर आंतरराष्ट्रीय अॅथलेटिक्स फेडरेशनने आपला निर्णय मागे घ्‍यावा." असे म्हटले होते. तर, फेडरेशनच्या मते, ''आंतरराष्‍ट्रीय ऑलिम्पिक असोसिएशनचे मत विचारात घेऊनच पौरुषत्व चाचणीचे नियम बनवलेले आहेत.''
ऑलिम्पिक हेच ध्‍येय
द्युती म्‍हणते, ' बंदीमुळे मी खूप निराश झाले होते. पुन्हा आंतरराष्‍ट्रीय स्‍तरावर स्पर्धेत सहभागी होऊ शकेल की नाही, याची शंका होती. माझ्या कामगिरीवरही परिणाम झाला आहे. आता माझी आशाही बळावली आहे, रिओ ऑलिम्पिक माझे ध्‍येय आहे.'

पुढील स्‍लाईडवर क्‍लिक करून पाहा, द्युतीचे फोटो आणि करिअरमधील खास बाबी..