आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छत्रपती चषक बास्केटबॉल स्पर्धा १९ फेब्रुवारीपासून

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - एमएसएम बास्केटबॉल स्पोर्ट््स असोसिएशन आणि जॉगर्स ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंतीनिमित्त छत्रपती चषक बास्केटबॉल स्पर्धेचे १९ ते २१ फेब्रुवारीदरम्यान मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर आयोजन करण्यात आले आहे.
स्पर्धेत १४ व १७ वर्षांखालील मुलामुलींचे संघ सहभागी होऊ शकतात. स्पर्धा साखळी आणि बाद पद्धतीने खेळवली जाईल. विजेत्यांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येईल. शाळा, महाविद्यालय, क्रीडा मंडळांच्या इच्छुक संघांनी १८ फेब्रुवारीपर्यंत प्रवेश निश्चित करावा. अधिक माहितीसाठी स्पर्धा सचिव प्रशांत बुरांडे, विश्वास कड यांच्याशी संपर्क साधावा. स्पर्धेची तांत्रिक जबाबदारी विजय पिंपळे यांच्याकडे देण्यात आली आहे. जास्तीत जास्त संघांनी स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन जॉगर्स नीलेश पहाडे, आयोजन समितीचे अध्यक्ष गणेश कड, कार्याध्यक्ष डॉ. मकरंद जोशी आणि कोशाध्यक्ष सय्यद रफिक यांनी केले.