आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Chennai Smashers And Mumbai Rockets Bag Comprehensive Victories In PBL 2017

क्रिकेटपासून दूर सचिन येथे पत्नीसमवेत दिसला रमताना, या टीमला केले चीयर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रीमियर बॅडमिंटन लीग (पीबीएल) मध्ये मंगळवारी 'चेन्नई स्मॅशर्स'ने 'बंगळुरू ब्लास्टर्स' यांच्यात लढत झाली. जी लढत पाहायला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर स्वत: पत्नी अंजलीसमवेत उपस्थित होता. - Divya Marathi
प्रीमियर बॅडमिंटन लीग (पीबीएल) मध्ये मंगळवारी 'चेन्नई स्मॅशर्स'ने 'बंगळुरू ब्लास्टर्स' यांच्यात लढत झाली. जी लढत पाहायला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर स्वत: पत्नी अंजलीसमवेत उपस्थित होता.
मुंबई- प्रीमियर बॅडमिंटन लीग (पीबीएल) मध्ये मंगळवारी 'चेन्नई स्मॅशर्स'ने 'बंगळुरू ब्लास्टर्स' यांच्यात लढत झाली. जी लढत पाहायला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर स्वत: पत्नी अंजलीसमवेत उपस्थित होता. तो आपली टीम बंगळुरूला चीयर करण्यासाठी आला होता. असे असले तरी त्याच्या उपस्थितीत त्याची टीम मॅच जिंकू शकली नाही. अंजलीला समजावत होता सचिन...
 
- मॅच दरम्यान असे अनेक मोमेंट आले जेथे अंजलीला काही गोष्टी समजल्या नाहीत.
- ज्यानंतर सचिन तिला बॅडमिंटनमधील बारीक गोष्टी समजावून सांगताना दिसला.
-यामुळे त्यांच्यात अनेकदा सुरु असलेली चर्चा कॅमे-यात कैद झाली.
-आपल्या माहितीसाठी हे की,  PBL मधील टीम 'बंगळुरू ब्लास्टर्स' मध्ये सचिनची भागीदारी आहे.
- मॅच दरम्यान सचिन बॅडमिंटन कोच पी. गोपीचंद यांच्याशी संवाद साधताना दिसला.
 
सिंधु-कश्यपने जिंकली मॅच-
 
- रिओ ऑलिम्पिकमधील रौप्यपदक विजेती पी. व्ही. सिंधू दुसऱ्या सत्राच्या प्रीमियर बॅडमिंटन लीगमध्ये (पीबीएल) विजयी ट्रॅकवर परतली. - तिने ट्रंप सामन्यात बाजी मारून चेन्नई स्मॅशर्सला विजय मिळवून दिला. 
- चेन्नईने सामन्यात बंगळुरू ब्लास्टर्सवर 5-0 अशा फरकाने मात केली. 
- सिंधूने महिला एकेरीच्या सामन्यात बंगळुरूच्या चेंऊगला 12-10, 11-6 ने पराभूत केले. तसेच कश्यपनेही चेन्नईच्या विजयात मोलाचे योगदान दिले. 
- आता आपली विजयी लय कायम ठेवण्याचा चेन्नईचा प्रयत्न असेल. दुसरीकडे सिंधूही आपला फॉर्म कायम ठेवण्यासाठी उत्सुक आहे.
- तिला गत सामन्यात कॅरोलीना मरीनने धुळ चारली होती. मात्र, याचा बदला काढण्यासाठी सिंधू प्रयत्नशील असेल. 
 - विक्टर एक्सेलसनने टामी सुगियार्तोला 26 मिनिटात 11-7, 13-11 असे हरवले. 
- आमखी एका मॅचमध्ये मुंबईने दिल्लीला 5-1 असे हरवले. 
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, मॅच दरम्यान सचिन आणि त्याची पत्नी अंजलीचा अंदाज...
बातम्या आणखी आहेत...