आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आधी पळू शकत नव्हती; आता आहे मॅरेथॉनपटू, मल्टिपल स्क्लेरोसिस आजाराने त्रस्त

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सॅन डिएगो - चेरिल हाइल अमेरिकेच्या युनिव्हर्सिटी ऑफ सॅन डिएगोत संचालक होते. तिला धावणे खूप आवडायचे. ती आपल्या नवऱ्यासोबत रोज धावायची. मात्र, दहा वर्षांपूर्वी ितला मल्टिपल स्क्लेरोसिस नावाचा आजार झाला. या आजारात माणसाच्या मेंदूचा शरीराशी ताळमेळ नसतो. यात आजारी माणूस चिन्हसुद्धा ओळखू शकत नाही. अशा माणसाच्या शारीरिक, मानसिक आजारपण तर कधी तो मनोरुग्णसुद्धा बनू शकतो. आधी बरे किमी धावणारी चेरिल या आजारामुळे १०० मी. सुद्धा धावू शकत नव्हती. एक किलोमीटर धावताना ती किमान १२ ते १५ वेळा पडायची. यानंतर तिने आपल्या न्यूरॉलॉजिस्टला गाठले. डॉक्टराला भेटल्यानंतर तिच्यात या आजारपणाचे लक्षण दिसले. डॉक्टराने चेरिलला याची माहिती दिली. तिच्या उजव्या पायात बळ राहिले नव्हते. चेरिलने आपला आर्थोपिडशन एरा मिरजाएनला संपर्क साधला. एराने तिच्या उजव्या पायात सपोर्टसाठी ब्रेसेस लावले. शरीराचा जो भाग दुबळा होतो, तेथे ब्रेसेस लावले जातात. यानंतर चेरिलने हळूहळू धावण्यास सुरुवात केली. या आजारपणाचा काहीच उपचार नाही, असे डॉक्टरांनी तिला आधीच सांगितले होते. मात्र, औषधीने त्यावर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवता येते. अशा स्थितीतसुद्धा चेरिलने धावणे सुरू ठेवले.
ती म्हणाली, “कधी कधी मला वाटायचे की कोणीतरी माझा हात ओढतोय. कधी शरीर कापायचे. कधी विजेसारखा झटका बसायचा. तर कधी शरीरावर साप चालत आहे, असे वाटायचे. कधी हात थंड व्हायचे तर कधी खूप गरम. मी कधी कधी धावताना पडायचे, तरीही मी रोज माझ्या धावण्याचे अंतर वाढवत होते. माझ्या नवऱ्याने मला साथ दिली. ते नेहमी माझ्यासोबत धावत. ब्रेसेसमुळे मदत झाली. डायग्नोसिसच्या आधी मी १५ मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले होती. पुन्हा मॅरेथॉनमध्ये धावण्याचे ठरवले. धावण्याचे अंतर वाढवू लागले. स्टॅमिनाही वाढत होता. काही छोट्या रेसमध्ये सहभागी झाले. रेस पूर्ण केल्यावर सकारात्मक विचार येऊ लागले. स्वत:च प्रेरित झाले. मागच्या वर्षांत मी जवळपास ३० ते ३५ मॅरेथॉनमध्ये धावले आहे. मागच्या महिन्यात मी केपटाऊन मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले होती.’
चेरिल म्हणाली, ‘आता मी सात उपखंडाच्या सात मॅरेथॉनमध्ये धावण्याचे ठरवले आहे. माझे पती सोबत धावणार आहेत.'
बातम्या आणखी आहेत...