आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू सुपर ग्रॅंड मस्टर विश्वनाथन आनंदला मातृशोक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नई- आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंदच‍ी आई सुशीला यांचे बुधवारी रात्री झोपेतच निधन झाले. मृत्युसमयी त्या 79 वर्षांच्या होत्या. बसंतनगर स्मशानभूमीत गुरुवारी सुशीला यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पती के. विश्वनाथन, मुलगी, दोन मुले आहेत.
आनंदला विश्वविजेता बुद्धिबळपटू घडवण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले, अशा शब्दांत अ.भा. बुद्धिबळ महासंघाचे अध्यक्ष पी.आर.वेंकटरामा राजा यांनी शोक व्यक्त केला आहे. सुशीला यांनी विश्वविजेत्याला बालपणी खेळातील बेसिक चाली शिकवल्या.