आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्जेंटिनाला ‘चिली’ तडका, स्टार फुटबॉलपटू लियोनेल मेसीची निर्णायक क्षणी गल्लत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ईस्ट रुदरफोर्ड (न्यूजर्सी)- स्टार फुटबॉलपटू लियोनेल मेसीने निर्णायक क्षणी चूक केल्याने अर्जेंटिनाला धक्का बसला. कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेत चिलीने अर्जेंटिनाला ४-२ ने पराभूत करून सलग दुसऱ्यांदा स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. मागच्या वेळेप्रमाणे या वेळीसुद्धा चिली आणि अर्जेंटिना या दोन संघांतच फायनल सामना रंगला.
दोघांत जोरदार संघर्ष झाला. अखेरच्या क्षणापर्यंत रोमांचक ठरलेल्या सामन्यात दोन्ही संघांना निर्धारित ९० मिनिटांत एकही गोल करता आला नाही. यानंतर ३० मिनिटांचा अतिरिक्त वेळ देण्यात आला. यातही गोलरहित बरोबरी झाली. अखेर विजेत्याचा निकाल पेनॉल्टी शूटआऊटवर लागला.

पेनल्टी शूटआऊटमध्ये चिलीकडून कॅस्टिलो, चार्ल्स एरेन्गुईज, जीन बीयूसेयोर आणि फ्रान्सिस्को सिल्वा यांनी गोल केले, तर अर्जेंटिनाकडून मॅसकारानो आणि सर्जियो अॅग्योरो यांनाच गोल करता आले, तर लियोनेल मेसी आणि लुकास बिगलिया यांनी गोल करण्याची संधी दवडली.
बातम्या आणखी आहेत...