आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिली अंतिम अाठमध्ये; सांचेझ, वर्गास चमकले; पनामाला 4-2 ने हरवले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फिलाडेल्फिया- एदु आर्दोवर्गास आणि अॅलेक्सिस सांचेझ यांच्या "डबल ब्लास्ट'च्या बळावर गतविजेता चिलीने पनामाला जबरदस्त रंगलेल्या सामन्यात ४-२ ने पराभूत करून कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेच्या क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला. इतर एका सामन्यात अर्जेंटिनाने बोलेव्हियावर ३-० ने मात केली.

कोपा अमेरिकाच्या गटातील अखेरच्या सामन्यात चिलीने कमाल कामगिरी करताना अंतिम आठमध्ये प्रवेश केला. चिलीकडून सामन्याच्या पहिल्या हाफमध्ये वर्गासने दबदबा गाजवला. त्याने सामन्याच्या १५ व्या आणि ४३ व्या मिनिटाला गोल केला. दुसऱ्या हाफमध्ये सांचेझने ५० व्या आणि ८९ व्या मिनिटाला गोल केला. पनामाकडून मिगुएल कॅमारगोने पाचव्या आणि एबडिएल एरोयोने ७५ व्या मिनिटाला गोल करून पराभवातील हे अंतर कमी केले.

अर्जेंटिना अव्वल : गटातीलसर्व सामने झाल्यानंतर अर्जेंटिना आपले तिन्ही सामने जिंकून सर्वाधिक गुणांसह अव्वलस्थानी आहे. चिली दोन विजयांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. दोन्ही संघांनी बादफेरी गाठली आहे. पनामा आणि बोलेव्हिया तिसऱ्या आणि चौथ्या स्थानी आहेत. पुढच्या फेरीत अर्जेंटिनाचा सामना व्हेनेझुएलासोबत रंगेल, तर चिलीचा सामना मेक्सिकोसोबत होईल.