आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फुटबॉलच्या वर्चस्वासाठी चीनचा अब्जावधींचा डाव, स्पेन, ब्राझीलमधून कोच, खेळाडू बोलावले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चीनच्या धुंदीत लपेटलेल्या गुआंगझाऊ या शहराबाहेर एका डोंगराच्या उतारावर इमारतींच्या रांगाच रांगा दृष्टीस पडतात. प्रवेशद्वारावर जागतिक फुटबॉल ट्रॉफीची वीस फूट उंच प्रतिकृती लावलेली आहे. मैदानांवरून फुटबाॅलच्या चेंडूंचे आवाज येत आहेत. एव्हरग्रांडे फुटबॉल स्कूलमध्ये प्रसिद्ध बार्सिलोना क्लबच्या वेगाने पास देऊन पुढे जाण्याची टिकी-टाका स्टाइलमध्ये फुटबॉलचे प्रशिक्षण देण्यात येते. ही जगातील सर्वात मोठी फुटबॉल स्कूल आहे. येथे स्पेनचे २४ प्रशिक्षक २८०० चिनी युवकांना खेळाचे बारकावे शिकवतात.
माद्रिदचे ४० वर्षीय सर्जियो जार्को डियाज सांगतात की, १२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या या मुलांनी स्पॅनिश फुटबॉलचे बारकावे शिकून घेतले आहेत. ते स्पॅनिश संघाच्या स्तरापर्यंत पोहोचू शकतात. चार वर्षांपूर्वी स्कूलच्या सुरुवातीपासूनच डियाज जुळलेले आहेत. एव्हरग्रांडेसारखी अकॅडमी संपूर्ण चीनमध्ये उघडण्यात येत आहेत. हे या ग्लोबल खेळात देशाला वर्चस्व मिळवून देण्याच्या अभियानाचे प्रमाण आहे. मार्चपासून चिनी सुपर लीगचे नवे सीझन सुरू झालेले आहे. यामध्ये जगातील नामवंत खेळाडू सहभागी झाले आहेत. लीगने खेळाडूंच्या ट्रान्सफर सीझनदरम्यान १९९५ कोटी रुपये खर्च केले आहेत. ही रक्कम युरोपच्या पाच मोठ्या लीगच्या एकूण खर्चापेक्षा जास्त आहे. जगातील सर्वात श्रीमंत देशांतर्गत स्पर्धा इंग्लिश प्रीमिअर लीग खर्चाच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर राहिली. तिसऱ्या क्रमांकावर चीनची दुय्यम दर्जाची लीग राहिली आहे.
जगातील नामवंत खेळाडू प्रशिक्षक आता लंडन, मिलानएेवजी शांघाई, नानजिंगकडे आकर्षित होत आहेत. ब्राझील स्टार अॅलेक्स टिक्सिएरा रामिरेज सेंटोस यांनी एक चिनी टीमशी क्रमश: ३७० कोटी २३९ कोटींचा करार करून खळबळ उडवली आहे. चिनी लीगच्या २०१६-२०च्या टेलिव्हिजन प्रसारण अधिकार सरकारी इन्व्हेस्टमेंट कंपनी चायना मीडिया कॅपिटलला ८६ अब्ज रुपयांत विकले आहेत. हा करार गेल्या कराराच्या तीस पट अधिक आहे.
या फुटबॉल क्रांतीला चिनी राष्ट्रपती शी जिन पिंग यांनी समोर नेले आहे. शी यांनी २०१४ मध्ये चीनची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी ५० सूत्री रोड मॅप सादर केले होते. शी यांच्या मास्टर प्लॅनमध्ये येत्या वर्षांत २०,००० विशेष फुटबॉल स्कूल उघडण्याचा प्रस्ताव आहे. दहा वर्षांत त्यांची संख्या ५०,००० होणार आहे. त्यांची नजर २०२६च्या वर्ल्ड कपच्या आयोजनावर आहे. जर आयोजन समितीने कथित अनियमिततेच्या कारणाने २०२२ वर्ल्ड कपचे यजमानपद कतरकडून परत घेण्याचा निर्णय घेतला तर चीन आयोजनासाठी तयार होऊ शकते.
चीनने अनेक खेळांमध्ये विशेष स्थान बनवले आहे. त्यांनी २००८च्या िबजिंग ऑलिम्पिकमध्ये ५१ सुवर्ण पटकावले होते. मात्र, त्यांचे फिफा रँकिंग ९६ आहे. चीन केवळ एकदाच वर्ल्ड कपसाठी पात्र ठरला आहे. चिनी जनता फुटबॉलप्रेमी आहे. युरोपचे मोठे संघ ऑफ सीझनमध्ये शांघाई आणि बिजिंगचा नियमित दौरा करतात. दुसरीकडे चीनच्या फुटबॉलमध्ये भ्रष्टाचाराची संस्कृतीही आहे. अवैध गॅम्बलिंग सिंडीकेटमध्ये खेळाडू, कोच आणि रेफरी सहभागी असल्याचे आढळले होते. २००७ मध्ये सिंगापूरला सट्टेबाजांनी जगभर मॅच फिक्स केले होते. यामध्ये चीनच्या उत्तरी पूर्व भागात सक्रिय असलेल्या गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या टोळ्यांचा सहभाग असल्याचे सिद्ध झाले होते. त्यानंतर सरकारने कठोर पावले उचलली होती.