आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चीन अाेपन टेनिस स्पर्धा: अग्निजस्का रदावांस्काला अजिंक्यपद, इंग्लंडची काेन्ता उपविजेती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग - पाेलंडची अग्निजस्का रदावांस्का रविवारी चीन अाेपन टेनिस स्पर्धेत चॅम्पियन ठरली. तिने महिला एकेरीचे अजिंक्यपद पटकावले. तिने फायनलमध्ये इंग्लंडच्या नंबर वन जाेहाना काेन्तालला धूळ चारली. पाेलंडच्या रदावांस्काने ६-४, ६-२ असा शानदार विजय मिळवला. पराभवामुळे इंग्लंडच्या खेळाडूला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. रदावांस्काने दमदार सुरुवात करताना पहिल्या सेटवर बाजी मारली. यासह तिला अाघाडी घेता अाली.
नदालला दुहेरीचे जेतेपद : जगातील माजी नंबर वन राफेल नदालने स्पर्धेत पुरुष दुहेरीचा किताब पटकावला. त्याने बुस्टासाेबत दुहेरीची फायनल जिंकली.
बातम्या आणखी आहेत...