आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चीन अाेपन टेनिस स्पर्धा; राेहन बाेपन्ना पुरुष दुहेरीत विजयी; शारापाेवा, नदालची अागेकूच

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग- माजी नंबर वन मारिया शारापाेवा अाणि नंबर वन राफेल नदालने डायमंड काेर्टवर शानदार विजय संपादन करून चीन अाेपन टेनिस स्पर्धेत अागेकूच केली. दुसरीकडे भारताच्या टेनिसस्टार सानिया मिर्झाने महिला दुहेरीच्या अंतिम ८ मध्ये धडक मारली. तसेच राेहन बाेपन्ना पुरुष दुहेरीत उपांत्यपूर्व फेरीत दाखल झाला. त्याने अंतिम १६ मधील सामना नव्या सहकाऱ्यांसाेबत जिंकला.   

महिला एकेरीत दुसऱ्या मानांकित सिमाेना हालेपने शानदार विजयी सलामी दिली. तिने लढतीत बिगरमानांकित राबारकाेवाचा पराभव केला. तिने ६-२, २-१ ने विजय निश्चित केला. दरम्यान राबारकाेवा दुखापतीमुळे पुढे खेळू शकली नाही. दरम्यान, अाघाडीवर असलेल्या सिमाेनाला विजयी घाेषित करण्यात अाले. त्यापाठाेपाठ पेत्रा क्विताेवाने सलामीचा सामना जिंकला. तिने अमेरिकेच्या बिगरमानांकित लेंपचेंकाेवावर मात केली. तिने ६-४, ६-४ ने सामना जिंकला.  

बाेपन्नाची अागेकूच 
राेहन बाेपन्नाने कुइवाससाेबत पुुरुष दुहेरीचा सामना जिंकला. त्यांनी लढतीत चीनच्या गाेंग-झांगवर मात केली. त्यांनी ६-०, ६-४ ने विजय नाेंदवला. यासह त्यांनी अंतिम ८ मधील अापला प्रवेश निश्चित केला.
 
नदालची लुकासवर मात 
 पुुरुष एकेरीच्या सलामीला नंबर वन राफेल नदालला विजयासाठी शर्थीची झंुज द्यावी लागली. त्याला फ्रान्सच्या लुकासने पहिल्या फेरीत चांगलेच झंुजवले. मात्र, यात नदाल सरस ठरला. त्याने सरस खेळी करताना सामना जिंकला. त्याने ४-६, ७-६, ७-५  ने सामना जिंकला. पहिल्या सेटवरील अपयशातून सावरलेल्या नदालने वेळीच पुनरागमन करून विजयश्री खेचून अाणली. लुकासने पहिला सेट जिंकून दमदार सुरुवात केली हाेती. 

सानियाचा दुहेरीत विजयी धमाका! 
भारताच्या सानिया मिर्झाने महिला दुहेरीच्या अंतिम १६ मध्ये चीनच्या पेंगसाेबत एकतर्फी विजय संपादन केला. या तिसऱ्या मानांकित जाेडीने लढतीत स्चुरीस-मार्टिन्सचा पराभव केला. त्यांनी ७-५, ६-२ ने विजय मिळवला. त्यांनी अंतिम अाठमध्ये प्रवेश केला.   

शारापाेवाचा विजय 
बिगरमानांकित रशियन टेनिसस्टार मारिया शारापाेवाने महिला एकेरीत शानदार विजय संपादन केला. तिने  अापल्याच देशाच्या एकतारिना मकाराेवाचा पराभव केला. तिने ६-४,४-६, ६-१ ने राेमहर्षक विजय नाेंदवला. यासाठी तिला शर्थीची झंुज द्यावी लागली. तिने दमदार सुरुवात करताना सहज पहिला सेट जिंकला. मात्र, तिला दुसऱ्या सेटवर माेठा धक्का बसला. मकाराेवाने हा सेट जिंकून लढतीत बराेबरी साधली हाेती. मात्र, त्यानंतर शारापाेवाने दमदार पुनरागमन करताना तिसरा सेट जिंकला.   
बातम्या आणखी आहेत...