आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • Rio Olympics 2016: Fu Yuanhui, The China Swimmer Breaks Period Taboo And Stereotypes In Sport

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मासिक पाळीविषयी जाहीर वक्तव्य, मायदेशी काैतुक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकून खेळाडू रातोरात प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचतात. अनेक खेळाडू पदक हरल्याने खलनायकासारखा दुस्वासही सहन करतात. चीनची जलतरणपटू फू युआनहुई पदक न जिंकताही देशाच्या गळ्यातील ताईत झाली. पराभवानंतर तिने वेगाने पोहू न शकल्याची कबुली दिली. आदल्या दिवशीच मासिक पाळी सुरू झाल्याचे कारण तिने जाहीरपणे बोलून दाखवले. तिच्या या स्पष्टवक्तेपणाचे चीनने भरभरून कौतुक केले हेदेखील महत्त्वाचे व अनपेक्षितच.

२० वर्षीय फू युआनहुई महिलांच्या ४ बाय १०० मीटर रिलेमध्ये लू यिंग, शी जिनग्लिन आणि झू मेंघुईसोबत स्पर्धेत उतरली होती. चीनचा चमू पदकाचा प्रमुख दावेदार होता. मात्र त्यांना चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेनंतर एका पत्रकाराने चमूतील ३ जलतरणपटूंची मुलाखत घेतली. मात्र तेथे फू नव्हती. फू त्या वेळी एका बोर्डच्या मागे खिन्न बसली होती. पत्रकाराने प्रतिक्रिया मागितली तर फू म्हणाली, ‘ मी या वेळी वेगाने पोहू शकले नाही. मी माझ्या चमूची सार्थ साथ दिली नाही. त्यांची मान खाली जाण्यास मी कारण ठरले.’ ती वेदनेने अस्वस्थ होती हे पाहून पत्रकाराने विचारले, तुमची तब्येत ठीक आहे ना ? त्यावर फू उत्तरली, ‘माझी मासिक पाळी कालच सुरू झाली होती. त्यामुळे थकवा जाणवत होता. मात्र ही पळवाट ठरू शकत नाही. मी तरीही पोहू शकते. मात्र आज तसे घडले नाही.’

मी तिशीत आहे, मात्र खुलेपणाने बोलू शकत नाही
पाळीविषयी मोकळेपणाने कबुली दिल्याने चीनच्या समर्थकांनी फूचे कौतुक केले. चीनच्या सोशल मीडिया वीबोवर ताआे नामक वापरकर्त्याने लिहिले, ‘पाळीदरम्यान पोहल्याने मला फूचे कौतुक वाटते. चौथे स्थान मिळवल्याची खंत आहे, मात्र फूविषयी आम्हाला अभिमान वाटतो. ’ दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले, ‘ महिला याविषयी बोलणे टाळतात. मात्र पाळी कधीही येऊ शकते. आपण त्यांची वेदना जाणली पाहिजे.’

काही लोकांनी फूवर टीकाही केली. मासिक पाळीदरम्यान ती तलावात का उतरली? एडि्वंगन्यूने लिहिले, ‘चिनी लोकांमध्ये सॅनिटरी नॅपकिन्सविषयी पूर्वग्रह आहेत. मी ३० वर्षांची आहे. मात्र याविषयी अद्यापही निष्काळजी व भेदरलेली असते.’ या वक्तव्यानंतर सॅनिटरी नॅपकिनच्या वापराविषयीही चर्चा सुरू झाली आहे. एका सर्व्हेनुसार चीनमध्ये केवळ २ % महिला सॅनिटरी नॅपकिन्सचा वापर करतात तर अमेरिकेत ४२ % महिला याचा वापर करतात. बहुतांश चिनी महिलांना याविषयी माहितीच नाही, असे धक्कादायक वास्तवही समोर आले.
निम्म्यापेक्षा अधिक खेळाडूंना भय, पाळीमुळे कामगिरी खालावते
स्पोर्ट््स तज्ज्ञ जियोर्जी ब्रूइनवेल्स यांनी एका संकेतस्थळावर सांगितले, ‘क्रीडा क्षेत्रात बहुतांश प्रशिक्षक पुरुष आहेत. महिला खेळाडूंना याविषयी सांगण्यास संकोच वाटतो. मासिक पाळी आणि खेळातील कामगिरी यांचा परस्परसंबंध उलगडणारे संशोधन अद्याप झाले नाही असे महिला म्हणतात. मात्र या काळात शरीरातील लोहाचे प्रमाण घटते. लंडन विद्यापीठाच्या सहकार्याने १८०० महिला खेळाडूंची माहिती संकलित करण्यात आली. यात सिद्ध झाले की निम्म्यापेक्षा अधिक खेळाडूंना मासिक पाळीचा विपरीत परिणाम कामगिरीवर होतो असे वाटते. शारीरिक नसेल तर मानसिक प्रभाव तर असतोच, असे त्यांचे मत होते.
बातम्या आणखी आहेत...