आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रिस फ्रूम बनला ‘टूर द फ्रान्स’चा चॅम्पियन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पॅरिस - टीम स्कायचा ब्रिटिश सायकलपटू क्रिस फ्रूमने २१ फे-यांच्या "टूर द फ्रान्स' स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. त्याने दुस-यांदा ही स्पर्धा जिंकली. त्याने रविवारी सायकलिंगमधील सर्वाधिक प्रतिष्ठित स्पर्धा आपल्या नावे केली. ३० वर्षीय फ्रूम २०१३ मध्येसुद्धा येथे चॅम्पियन बनला होता.
टूरची अखेरची शर्यत रविवारी सेवरहून सुरू झाली आणि पॅरिसला संपली. १०९ किमीची ही शर्यत लोट्टो सॉडलचा जर्मन सायकलपटू आंद्रे ग्रिपेलने जिंकली. मात्र, ओव्हरऑल चॅम्पियनशिप क्रिस फ्रूमने आपल्या नावे केली. त्याने २१ फे-या एकूण ३,३६०.३ कि.मी. अंतर ८१ तास आणि ५६ मिनिटे ३३ सेकंदांत पूर्ण केली. मोविस्तर संघाचा कोलंबियन सायकलपटू नायरो क्विंताना दुसरा, तर स्पॅनिश सायकलपटू अॅलेक्झांड्रा वाल्वेद्रे तिस-या स्थानी आला. क्विंतानने फ्रूमपेक्षा एक तास आणि १२ मिनिटे अधिक वेळ घेतला. वाल्वेद्रेने रेस पूर्ण करण्यासाठी फ्रूमपेक्षा ५ मिनिटे आणि २५ सेकंदांचा वेळ अधिक घेतला. टूरच्या पहिल्या फेरीला ४ जुलै रोजी हॉलंडच्या उत्रेच्त येथे सुरुवात झाली होती.

२२ संघ, १९८ सायकलपटू
टूर द फ्रान्सची ही १०२ वी स्पर्धा होती. यात एकूण २२ संघांचे १९८ सायकलपटू सहभागी होते. यात ३२ देशांच्या खेळाडूंनी सहभाग घेतला. यात सर्वाधिक ४१ सायकलपटू फ्रान्सचे होते.