आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टी-20 क्रिकेटमध्ये गेलच्या 10 हजार धावा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राजकोट - वेस्ट इंडीजचा आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सलामीवीर क्रिस गेलने मंगळवारी गुजरात लायन्सविरुद्ध ७७ धावांच्या खेळीदरम्यान इतिहास रचला. टी-२० क्रिकेटच्या इतिहासात गेल १० हजार धावा काढणारा जगातला पहिला फलंदाज ठरला आहे.
 
३७ वर्षीय गेलने बासिल थम्पीच्या चेंडूवर थर्डमॅनला फटका खेळून १० हजार धावांचा टप्पा गाठला. या सामन्याआधी गेलला १० हजारी बनण्यासाठी केवळ ३ धावांची गरज होती. या सामन्याआधी गेलच्या नावे टी-२० क्रिकेटमध्ये २८९ सामन्यांत ४०.४७ च्या सरासरीने ९९९७ धावा होत्या. आता त्याच्या नावे २९० सामन्यांत १००७४ धावा त्याच्या नावे झाल्या आहेत. गेलने टी-२० क्रिकेटमध्ये आतापर्यंत १८ शतके आणि ६० अर्धशतके ठोकली आहेत.   
 
{ गेलने २०१३ च्या आयपीएलमध्ये पुणे वॉरियर्सविरुद्ध नाबाद १७५ धावांची खेळी केली होती. टी-२० क्रिकेटच्या इतिहासात ही आतापर्यंतची वैयक्तिक सर्वोच्च खेळी ठरली आहे. गेलचा  हा विक्रम प्रदीर्घ काळ कायम राहण्याची शक्यता आहे.  
 
बातम्या आणखी आहेत...