आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Chris Gayle And Dwayne Bravo Was In Chennai To Participate At School Functions

पाहा गेलचा देशी अंदाज, म्हणाला- मला दीपिका पादुकोणसोबत सेल्फी घ्यायचाय!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ख्रिस गेल शाही व देशी अंदाजात दिसून आला. - Divya Marathi
ख्रिस गेल शाही व देशी अंदाजात दिसून आला.
चेन्नई- वेस्ट इंडिजचे दोन स्टार क्रिकेटर्स ख्रिस गेल आणि ड्वेन ब्राव्हो सध्या भारतात आहेत. मंगळवारी हे दोन्ही क्रिकेटर्स चेन्नईत होते. तेव्हा त्यांनी वेगवेगळ्या स्कूल आणि कॉलेजमध्ये तामिळनाडू प्रीमियर क्रिकेट लीगला प्रमोट केले. या दरम्यान एका स्कूलमध्ये गेलचे जोरदार वेलकम करण्यात आले. तो तेथे वेगळ्यात ढंगात दिसला. मुकुट घातला गेलने...
- ख्रिस गेलने चेन्नईत वेलामल स्कूलमध्ये जाऊन क्रिकेट लीगला प्रमोट केले.
- या दरम्यान त्याची लहान मुलांत खूपच क्रेज दिसली. या क्रिकेटिंग सुपरस्टारची एक झलक पाहण्यासाठी मुले खूपच एक्साइटेड होती.
- ख्रिस गेल बिलकूल शाही अंदाजात पालखीत बसून स्कूलमध्ये पोहचला. त्यानंतर त्याचे मुकुट घालून जोरदार स्वागत करण्यात आले.
- यावेळी गेलने फक्त लहान मुलांत तिरंगा फडकवला नाही तर लहान मुलांसमवेत डान्सही केला.
- गेलने येथे स्पोर्ट्स कॉम्पिटीशन जिंकणा-या मुलांना बक्षिसे दिली.
गेलने घेतले बॉलिवूड अभिनेत्रीचे नाव-

- प्रोग्रामदरम्यान गेलने स्कूलमधील मुलांच्या प्रश्नांची उत्तरे दिली.
- एक मुलाने त्याला विचारले की तू IPL मधील चेन्नई टीमकडून कधी खेळणार, यावर गेल म्हणाला, चेन्नई संघ आयपीएलमध्ये परत येताच मी याबाबत धोनीशी बोलेन.'
- एक मुलाने त्याला विचारले की, तूला कोणत्या सेलिब्रिटीचा ऑटोग्राफ घ्यायला आवडेल त्यावर गेल म्हणाला, 'ऑटोग्राफचा जमाना गेला आता सेल्फीचा जमाना आहे. मला दीपिका पादुकोणसमवेत सेल्फी घ्यायला आवडेल.'
- यानंतर गेलने चॅम्पियन सॉन्ग वर मुलांसमवेत डान्स केला. ज्याचा व्हिडिओ त्याने इंस्टाग्राम अकाउंटवर शेयर केला.
- तर, ड्वेन ब्रावो सुद्धा तमिळनाडु क्रिकेट लीगला प्रमोट करण्यासाठी दुस-या एका स्कूलमध्ये पोहचला. जेथे त्याने लहान मुलांसमवेत चॅम्पियन सॉन्गवर डान्स केला.
- यानंतर ब्रावो, स्टेला मॅरिस कॉलेजमध्ये गेला. जेथे त्याने फिमेल फॅन्ससमवेत एक सेल्फी घेतली.
पुढे स्लाईड्सद्वारे फोटोजमधून पाहा, या दोन्ही क्रिकेटर्सनी लहान मुलांसमवेत कशी केली मस्ती...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...