आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रिस्टियानाे राेनाल्डाेला ‘बॅलन डी ओर’चा पुरस्कार, मेसीला मागे टाकत मारली बाजी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पॅरिस - पाेर्तुगालचा स्टार फुटबाॅलपटू क्रिस्टियानाे राेनाल्डाेने प्रतिष्ठेच्या पुरस्काराचा चाैकार मारला. त्याने सत्रातील अव्वल कामगिरीच्या बळावर यंदाचा ‘बॅलेन डी अाेर’चा किताब पटकावला. अशा प्रकारे त्याने चाैथ्यांदा या पुरस्काराचा बहुमान पटकावला. त्याने २००८, २०१३, २०१४ अाणि २०१६ मध्ये हा पुरस्कार मिळवला. फ्रान्सच्या फुटबाॅल महासंघाच्या वतीने हा प्रतिष्ठेचा पुरस्कार दिला जाताे. यामध्ये १७३ क्रीडा पत्रकारांनी राेनाल्डाेच्या नावाला पहिली पसंती दर्शवली.
यादरम्यान, राेनाल्डाेने पुरस्काराच्या शर्यतीत असलेल्या बार्सिलाेनाच्या िलयाेनेल मेसी अाणि अॅटाेनी ग्रिजमॅनलाही पिछाडीवर टाकले. यासह राेनाल्डाेने मैदानापाठाेपाठ अाता पुरस्कारावरचेही अापले वर्चस्व अबाधित ठेवले अाहे. दरम्यान, मेसीला दुसऱ्या अाणि ग्रिजमॅनला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.

फाॅर्मात असलेल्या राेनाल्डाेने रियल माद्रिद क्लबला चॅम्पियन्स लीग अाणि पाेर्तुगालच्या टीमला युराेपियन चॅम्पियनशिप जिंकून दिली. यामध्ये त्याचे माेलाचे याेगदान ठरले.
बातम्या आणखी आहेत...