आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • City Opne Tennis Tournament, Kei Nisicori Champion

सिटी अाेपन टेनिस स्पर्धा; केई निशिकाेरी चॅम्पियन, स्लाेएन महिला गटात विजेती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाॅशिंग्टन- जपानचा केई निशिकाेरी सिटी अाेपन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीचा चॅम्पियन ठरला. त्याने पुरुष एकेरीच्या फायनलमध्ये अाठव्या मानांकित जाॅन इन्सरचा पराभव केला. जपानच्या २५ वर्षीय निशिकाेरीने ४-६, ६-४, ६-४ अशा फरकाने सामना जिंकला. यासह त्याने अापल्या करिअरमध्ये दहाव्या एटीपी किताबाची नाेंद केली.
जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानावर असलेल्या निशिकाेरीने पहिला सेट गमावल्यानंतर दमदार पुनरागमन केले. त्याने सलग दाेन सेट जिंकून सामना अापल्या नावे केला. या दरम्यान, दाेन वेळच्या चॅम्पियन जाॅन इस्नरला खांद्याच्या गंभीर दुखापतीमुळे समाधानकारक खेळी करता अाली नाही. याचा फायदा घेत निशिकाेरीने विजय संपादन केला. त्यामुळे अापल्या घरच्या मैदानावर जाॅनला पराभवाचा सामना करावा लागला. तसेच त्याचा तिसऱ्यांदा सिटी अाेपनचे विजेतेपद अापल्या नावे करण्याचा प्रयत्न अपयशी राहिला. त्यामुळे त्यामुळे त्याला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
स्लाेएन महिला गटात विजेती
स्लाेएन स्टीफन्सने महिला एकेरीचे अजिंक्यपद अापल्या नावे केले. तिने अंतिम सामन्यात रशियाच्या अनास्तासिया पावलुचेंकाेवाचा पराभव केला. तिने ६-१, ६-२ अशा फरकाने एकतर्फी विजयाची नाेंद केली. तसेच किताब अापल्या नावे केला.