वाॅशिंग्टन- जपानच्या केई निशिकाेरीने रविवारी सिटी अाेपन टेनिस स्पर्धेच्या फायनलमध्ये धडक मारली. त्याने पुरुष एकेरीच्या उपांत्य लढतीत राेमहर्षक विजयाची नाेंद केली. निशिकाेरीने उपांत्य लढतीत क्राेएशियाच्या मरिन सिलिचचा पराभव केला. त्याने ३-६, ६-१, ६-४ ने सामना जिंकला. यासह त्याने अंतिम फेरीतील अापला प्रवेश निश्चित केला. यासाठी दुसऱ्या मानांकित निशिकाेरीला तीन सेटपर्यंत झुंज द्यावी लागली. अाता त्याचा सामना अाठव्या मानांकित जाॅन इस्नरशी हाेईल. पहिला सेट गमावल्यानंतर निशिकाेरीने दमदार पुनरागमन केले.
जाॅनची जाॅन्सनवर मात
अमेरिकेच्या जाॅन इस्नरने पुरुष एकेरीच्या उपांत्य लढतीत अापल्याच देशाच्या स्टीव्ह जाॅन्सनला धूळ चारली. त्याने रंगतदार लढतीत ६-३, ३-६, ७-६ अशा फरकाने राेमहर्षक विजय संपादन केला. यासाठी त्याला शर्थीची झंुज द्यावी लागली.