आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Claudio Ranieri Says He Felt 'lighter' After Spurs Failed To Beat West Brom

न सांगताच रानेरीला केले होते बरखास्त; फुटबॉलचे वाटोळे करण्याचा होता आरोप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन- लियानार्डो उलाओने रविवारी स्वांसियाविरुद्ध खेळताना लिस्टर सिटीकडून तिसरा गोल केला तेव्हा त्यांचे कोच क्लाउडियो रानेरीचे डोळे पाणावले. असे पहिल्यांदा घडले नाही. या सत्रात रानेरी यांचे डोळे अनेक वेळा पाणावलेले दिसले.

ज्या ज्या वेळी त्यांची टीम जिंकली, त्या-त्या वेळी त्यांचे डोळे आनंदाने ओले व्हायचे. त्यांचे असे वारंवार भावूक होण्याचे कारण शोधणे कठीण नाही. त्यांनी मागच्या १८ महिन्यांत अनेक चढउतार पाहिले. एखाद्याच्या आत्मविश्वासाचा चुराडा होईल, असे टोमणेही ऐकले.

इटलीचे रानेरी दोन वर्षांपूर्वी ग्रीसचे कोच होते. करार दोन वर्षांचा होता. मात्र, चार महिनेच ते पदावर राहू शकले. त्यांची हकालपट्टी अत्यंत अवमानकारक होती. नोव्हेंेबर २०१४ मध्ये युरो क्वालिफाइंग सामन्यात ग्रीसच्या पराभवानंतर काही तासांतच त्यांची हकालपट्टी झाली. त्यांना सांगताच रानेरीला हाकलण्यात आले. त्यांच्या हकालपट्टीची सूचना त्यांना मीडियाकडून मिळाली. ग्रीसच्या फुटबॉलचा सत्यानाश करण्याचा आरोप त्यांच्यावर त्या वेळी लावण्यात आला. मात्र, रानेरी यांनी प्रतिक्रिया दिली नाही. जवळपास महिने त्यांचा कोणाशीही करार नव्हता. नंतर जुलै २०१५ मध्ये लिस्टर सिटीने त्यांना कोच बनवले. लिस्टर त्यावर्षी इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये (ईपीएल) १४ व्या क्रमांकावर होती. ते चांगल्या कोचच्या शोधात होते. रानेरीच्या नियुक्तीच्या लिस्टरच्या निर्णयावर युरोपियन मीडियात खिल्ली उडवण्यात आली. रानेरीची नियुक्ती "अनइन्स्पायरिंग', "ह्यूज गँबल', "डेड मॅन वॉकिंग'...सारखे मथळे वर्तमानपत्रात झळकले. मात्र, रानेरी यांनी एकाच वर्षात लिस्टरला १४ व्या क्रमांकावरून नंबर वनच्या सिंहासनावर पोहोचवले. रानेरी म्हणतात, "मी गुपचूप काम करत असतो. ढवळाढवळ आवडत नाही. यामुळे माझ्या विरोधकांची संख्या थोडी अधिकच असते.' रानेरीच्या प्रदर्शनाचे फळही मिळाले. येत्या जून रोजी इंग्लंडविरुद्ध "रेस्ट ऑफ वर्ल्ड' हा सामना होणार असून, या सामन्यासाठी "रेस्ट ऑफ वर्ल्ड' टीमचे मॅनेजर म्हणून रानेरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

लिस्टरने ईपीएलच्या या सत्रात आतापर्यंत ३५ पैकी २२ सामने जिंकले आहेत. सध्या लिस्टर ७६ गुणांसह लीगमध्ये टॉपवर आहे. टोटनहॅम ६९ व्या क्रमांकासह दुसऱ्या स्थानी आहे. दोन्ही संघांत गुणांचे अंतर आहे.

३० वर्षांत १६ संघांचे कोच राहिले आहेत क्लाउडियो रानेरी. लिस्टरसोबत त्यांचा आताचा करार १६.५० कोटी रु. वार्षिक असा आहे.