आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्रातर्फे सिंधूला 75 लाखांचे बक्षीस; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सिंधू आणि गोपीचंदचा सत्कार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मंगळवारी एका कार्यक्रमात राज्य शासनातर्फे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पी. व्ही. सिंधू हिला ७५ लाख रुपयांचा तर पी. गोपीचंद यांना २५ लाख रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी या वेळी राज्य शासनामार्फत ऑलिम्पिक पदक विजेती कुस्तीपटू साक्षी मलिक हिला ५० लाख रुपये तिच्या प्रशिक्षकांना २५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले.

महाराष्ट्रातील खेळाडू ललिता बाबर हिला ७५ लाख रुपये तिच्या प्रशिक्षकांना २५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले. याशिवाय महाराष्ट्रातून ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी झालेले खेळाडू आयोनिका पॉल, प्रार्थना ठोंबरे, दत्तू भोकनळ, देवराज वाल्मीकी कविता राऊत यांना प्रत्येकी ५० लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी जाहीर केले.
कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह राज्याचे शालेय शिक्षण आणि क्रीडामंत्री विनोद तावडे, कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष अरुण लखानी यांची प्रमुख उपस्थिती होती.
बातम्या आणखी आहेत...