आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Confusion In Wwe Divas Storylines Future Of Rusevlana

PHOTOS: रिंगमध्ये \'लव्ह ट्रँगल\', दोन लेडी रेसलरची बॉयफ्रेंडसाठी \'फ्री स्टाइल\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
समर रेवर तुटून पडलेली लाना (वरती) - Divya Marathi
समर रेवर तुटून पडलेली लाना (वरती)
मियामी - WWE च्या 'रॉ' इव्हेंटमध्ये बॉयफ्रेंडवरुन दोन महिला रेसलर्स एकमेकींशी भिडल्या. 'अमेरिकन ब्यूटी' समर रे आणि रशियन लाना यांच्यात 15 मिनीट जोरदार फाइट झाली. बर्‍याच प्रयत्नांती त्यांचे भांडण सोडवण्यात आले. यावेळी रेसलर रुसेव आणि डोल्फ जिग्लर मुक-दर्शक झाले होते आणि आपापल्या गर्लफ्रेंडला लढताना पाहात होते.
...हे होते भांडणाचे कारण
समर रे पुरुष रेसलर डोल्फ जिग्लरची गर्लफ्रेंड आहे, तर लाना बुल्गारियाचा रेसलर रुसेवची गर्लफ्रेंड आहे. काही दिवसांपूर्वी एका फाइट दरम्यान रुसेवचा पाय तुटला. त्यानंतर लानाने रुसेवला बाय-बाय करत डोल्फसोबत जवळीक वाढवली. लाना आणि डोल्फ एका इव्हेंटमध्ये त्यांचे नातेसंबंध जाहीर करणार होते. तिथे समर रे आणि रुसेव देखील पोहोचले. समरने लानाला डोल्फला सोडून पुन्हा रुसेवसोबत जाण्याचा आग्रह धरला. ती म्हणाली, 'तुझ्यासाठी रुसेवच योग्य आहे. तोच तुझी चांगली काळजी घेऊ शकतो. डोल्फ पेक्षा तोच तुला चांगले समजून घेईल. आणि जर तुला हे मान्य नसेल तर त्याचा परिणाम चांगला होणार नाही.' त्यावर लानाने कुत्सित हास्य करत नकार दिला. मग काय आपले प्रमे लाना हिसकावून घेत असल्याच्या जाणिवेने समर लालेलाल झाली आणि तिने एक जोरदार थप्पड लानाला लगावली.
इट का जवाब पत्थर से
कानशिलात भडका उडाल्यानंतर लाना देखील समरवर तुटून पडली. त्यानंतर दोघींनी एकमेकींच्या झिंज्या धरत 15 मिनीट फ्री स्टाइल केली. यावेळी डोल्फ आणि रुसेव त्यांना शांत करण्यात सपशेल अपयशी ठरले. या सगळ्या तमाशानंतरही लानाने डोल्फची साथ सोडली नाही.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, लाना आणि समरचे फ्री स्टाइल