आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरुषांनाच महिलांचे सामने आवडतात , सेरेना आणि योकोविकचे वाकयुद्ध

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंडियान वेल्स - "टेनिसमध्ये पुरुषांना महिलांच्या तुलनेत अधिक पुरस्कार रक्कम मिळाली पाहिजे,' या वर्ल्ड नंबर वन टेनिसपटू नोवाक योकोविकच्या विधानाने नव्या वादाला जन्म दिला. दुसरीकडे इंडियन वेल्स स्पर्धेच्या सीईओनेसुद्धा महिलांवर आक्षेपार्ह टीका करून टेनिसच्या चाहत्यांना त्रस्त करून सोडले आहे.

"महिला टेनिस खेळाडूंना जितकी बक्षीस रक्कम मिळायला हवी, तेवढी त्यांना मिळत आहे. मात्र, पुरुष खेळाडू अधिक बक्षीस रकमेचे हक्कदार आहेत. पुरुषांचा खेळ प्रेक्षकांना अधिक आकर्षित करतो,' असे ११ वेळेसचा ग्रँडस्लॅम विजेता सर्बियाच्या नोवाक योकोविकने सोमवारी म्हटले. खरे तर टेनिसमध्ये पहिल्यांदा १९७३ मध्ये महिलांना पुरुषांइतकीच बक्षीस रक्कम मिळाली होती. त्यासाठी तत्कालीन महिला चॅम्पियन खेळाडू बिली जीन किंगने आवाज उठवला होता. ग्रँडस्लॅम स्पर्धांत याला सर्वांत अखेरीस विम्बल्डनमध्ये लागू करण्यात आले. तेथे ३४ वर्षांनंतर समान पुरस्कार रक्कम दिली गेली. अॅथलेटिक्समध्ये १९९५ मध्ये पहिल्यांदा वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये समान बक्षीस रक्कम देण्यात आली. यावर्षी असे फिगर स्केटिंगमध्येही करण्यात आले. लंडन मॅरेथॉनच्या पहिल्या आयोजनापासूनच (१९८१) समान बक्षीस रक्कम देण्यात येते.

२०१४ च्या पाहणीनुसार ३५ पैकी २५ खेळांत पुरुष आणि महिला खेळाडूंना समान पुरस्कार दिला जातो. तर टूर द फ्रान्स (सायकलिंग), क्लिफ डायव्हिंग, डार्ट, सर्फिंग, स्नुकर, गोल्फ, स्क्वॅश, स्किइंग, क्रिकेट आणि फुटबॉलच्या बक्षीस रकमेत मोठे अंतर आहे. गोल्फच्या ओपन चॅम्पियनशिपच्या विजेत्याला यावर्षी १.१५ मिलियन पौंड (जवळपास ११ कोटी रु.) मिळतील, तर महिला विजेत्याला २९८.००० पौंडांवरच (जवळपास २.८५ कोटी रु.) समाधान मानावे लागेल. स्नुकर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये पुरुष विजेत्याला ३००.००० पौंड (जवळपास २.८७ कोटी रु.), तर महिला विजेत्यांना अवघे १.५०० पौंड (जवळपास १.४४ लाख रुपये) मिळतील.

पुरस्कारांत मोठे अंतर
फुटबॉल वर्ल्डकप : पुरुष : २२ मिलियन पौंड (जवळपास २१०.६७ कोटी रु.). महिला : ०.६३ मिलियन पौंड (६.०३ कोटी रु.)
क्रिकेट वर्ल्डकप : पुरुष : २.५ मिलियन पौंड (जवळपास २३.९४ कोटी रु.). महिला : ०.०४७ मि. पौंड (जवळपास ३८.३० लाख रु.).

मूरने काय म्हटले ?
"मी जर महिला टेनिस खेळाडू असतो, तर प्रत्येक रात्री गुडघ्यावर बसून देवाचे आभार मानले असते आणि म्हटले असते की, बरे झाले फेडरर आणि नदालचा जन्म झाला आणि हे दोघे टेनिसला पुढे नेत आहेत,' असे द. आफ्रिकेचे माजी खेळाडू रेमंड मूर एका पत्रकार परिषदेत म्हटले. मूरने यानंतर लगेचच माफी मागितली.

सेरेनाचे प्रत्युत्तर...
या विधानावर सेरेना भडकली. सेरेना म्हणाली, "मी आणि माझी बहीण व्हिनसने टेनिस खेळणे बंद केेले तर ते टेनिस बघणार नाहीत, असे अनेक जण रोज मला भेटून सांगत असतात. मूर यांचे विधान योग्य नाही. महिला टेनिसचे सामने पाहण्यासाठी पुरुषच आतुर असतात.'
बातम्या आणखी आहेत...