सिअॅटल- यजमान अमेरिका टीमने अापल्या घरच्या मैदानावर सरस खेळी करताना काेपा अमेरिका फुटबाॅल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. यजमान टीमने तब्बल २१ वर्षांनंतर स्पर्धेच्या अंतिम चारमधील अापला प्रवेश निश्चित केला. अमेरिकन फुटबाॅल टीमने उपांत्यपूर्व सामन्यात इक्वाडाेरचा पराभव केला.
यजमान टीमने २-१ अशा फरकाने सामन्यात एकतर्फी विजय साकारला. डेम्पसी (२२ मि.) अाणि झार्डेस (८५ मि.) यांनी केलेल्या गाेलच्या बळावर यजमान टीमने सामना जिंकला. इक्वाडाेरकडून अार्राेयाेने ७४ व्या मिनिटाला गाेल केला. मात्र, त्याला टीमचा पराभव टाळता अाला नाही. इक्वाडाेरचा सामन्यातील हा एकमेव गाेल ठरला.
यासह अमेरिकेने १९९५ नंतर प्रथमच स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दिमाखदारपणे प्रवेश केला. अाता येत्या मंगळवारी अमेरिका संघ उपांत्य सामना खेळणार अाहे.
दमदार सुरुवात करताना यजमान अमेरिका टीमने २२ व्या मिनिटाला अापल्या घरच्या मैदानावर गाेलचे खाते उघडले. डेम्पसीने गाेल करून यजमान टीमला १-० ने अाघाडी मिळवून दिली. त्यानंतर पिछाडीवर पडलेल्या इक्वाडाेरने बराेबरी मिळवण्यासाठी शर्थीची झुंज दिली. मात्र, या टीमला अपयशाला सामाेेरे जावे लागले. अखेर ७४ व्या मिनिटाला इक्वाडाेरला सामन्यात पहिला गाेल करता अाला. अार्राेयाेने गाेल करून टीमला बराेबरी मिळवून दिली. मात्र, त्यानंतर अवघ्या ११ मिनिटांत अमेरिकेने विजय निश्चित केला. झार्डेसने ८५ व्या मिनिटाला गाेल करून अमेरिकेला २-१ ने विजय मिळवून दिला.
यजमान टीमकडून झार्डेसने सरस खेळी केली. त्यामुळे टीमला हा विजय संपादन करता अाला नाही. दुसरीकडे इक्वाडाेरला शेवटपर्यंत समाधानकारक खेळी करता अाली नाही.
अर्जेंटिना-व्हेनेझुएला सामनाव्हेनेझुएलला टीमला स्पर्धेच्या अंतिम अाठमध्ये जगातील नंबर वन अर्जेंटिना टीमच्या तगड्या अाव्हानाला सामाेरे जावे लागेल. शनिवारी हे दाेन्ही संघ समाेरासमाेर असतील. जागतिक क्रमवारीत ८३ व्या स्थानावर असलेल्या व्हेनेझुएलाने मेक्सिकाेला बराेबरीत राेखून अंतिम अाठमध्ये प्रवेश केला.
अँटाेनियाे, जाेन्सला रेडकार्ड
अमेरिका अाणि व्हेनेझुएलला टीमच्या प्रत्येकी एका खेळाडूला गैरवर्तन चांगलेच महागात पडले. कारण त्यांना रेड कार्ड देण्यात अाले. परिणामी, अमेरिकेच्या जर्मेन जाेन्स अाणि इक्वाडाेरच्या अँटाेनियाेला ५१ व्या मिनिटाला मैदान साेडावे लागले.