आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धा : अर्जेंटिना, चिली सेमीत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोक्सबोरो - अर्जेंटिना आणि चिलीच्या फुटबॉल संघांनी आपापले क्वार्टर फायनलचे सामने जिंकताना कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. अर्जेंटिनाने व्हेनेझुएलावर, तर चिलीने मेक्सिकोवर एकतर्फी विजय मिळवला. अर्जेंटिनाने व्हेनेझुएलाला ४-१ ने तर चिलीने मेक्सिकोला ७-० ने पराभूत करून स्पर्धेबाहेर केले. आता सेमीफायनलमध्ये अर्जेंटिनाचा सामना ह्युस्टन येथे यजमान अमेरिकेसोबत, तर गतचॅम्पियन चिलीचा सामना कोलंबियाशी होईल.

प्लेअर ऑफ द मॅच ठरलेला अर्जेंटिनाचा स्टार स्ट्रायकर लियोनेल मेसीने या सामन्यात आपला ५४ वा आंतरराष्ट्रीय गोल करून गॅब्रियन बतिस्तुताच्या विक्रमाची बरोबरी केली. अर्जेंटिना आणि व्हेनेझुएला यांच्यात झालेल्या क्वार्टर फायनल सामन्यात गोंजालो हिग्वेनने मेसीच्या पासवर शानदार ड्राइव्ह मारून अर्जेंटिनाला सातव्या मिनिटातच गोल करून दिला. अर्जेंटिनाने १-० ने आघाडी घेतली. हिग्वेनने २८ व्या मिनिटात आपला दुसरा गोल करून संघाची आघाडी २-० अशी केली.

मेसीसाठी टाळ्यांचा गजर
सुपरस्टार मेसीने ६० व्या मिनिटाला सामन्यातील तिसरा आणि आपला पहिला गोल केला. त्याने गोल करताच स्टेडियममध्ये बसलेले सर्व प्रेक्षक, फॅन्स आपापल्या सीटवर उभे झाले आणि संपूर्ण स्टेडियममध्ये टाळ्यांच्या कडकडाट झाला. व्हेनेझुएलाकडून सलोमोन रोेंदोनने ७० व्या मिनिटाला त्यांच्या संघाकडून एकमेव गोल केला. याच्या एक मिनिटानंतर अर्जेंटिनाच्या एरिक लामेलाने गोल करून स्कोअर ४-१ असा केला. या गोलसह अर्जेंटिनाचा विजय जवळपास निश्चित झाला. संपूर्ण सामन्यात प्रेक्षकांनी मेसीला जोरदार पाठिंबा दिला. मैदानावर, प्रेक्षकांत मेसीच चमकला.

लक्ष्य केवळ कपचे विजेतेपद
मी खूप आनंदी आहे. बतिस्तुताच्या विक्रमाची मी बरोबरी करू शकलो. माझे लक्ष्य या वेळी कोपा अमेरिका कपचे विजेतेपद आपल्या संघाला मिळव्ून देण्याचे आहे. अाम्ही संघात योग्य बदल करीत आहोत. आम्ही योग्य दिशेने खेळत आहोत. - लियोनेल मेसी.
बातम्या आणखी आहेत...