आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • Coverage Of Various Game Event At Rio Olympics 2016 Day 10 In Divyamarathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

#Rio: बॅडमिंटनमध्‍ये श्रीकांत आणि सिंधू क्‍वार्टर फायनलमध्‍ये, बॉक्सिंगमध्‍ये विकास पराभूत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पी. व्‍ही.  सिंधू - Divya Marathi
पी. व्‍ही. सिंधू
रिओ - भारतीय बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू आणि किदाम्बी श्रीकांत यांनी आपल्यापेक्षा अधिक रँकिंगच्या खेळाडूंना पराभूत करून एकेरीच्या क्वार्टर फायनलमध्ये स्थान मिळवले आहे. १० वी मानांकित युवा खेळाडू पी. व्ही. सिंधूने आठवी मानांकित तैवानच्या ताई जू यिंगला २१-१३, २१-१५ ने मात दिली. आता सिंधूचा सामना दुसरी मानांकित आणि लंडन आॅलिम्पिकमध्ये रौप्यपदक विजेत्या चीनच्या वांग यिहानशी सामना होईल.

आघाडीनंतर सिंधूचा संघर्ष
सिंधूने सामन्यात चांगली सुरुवात केली. पहिल्या गेममध्ये ती ११-६ ने पुढे होती. या शानदार खेळाच्या बळावर तिने यिंगवर १२-१० ने आघाडी घेतली. सिंधूने पुनरागमन करताना आधी १९-१३ ने आघाडी घेतली आणि नंतर गेम २१-१३ ने जिंकला. दुसऱ्या गेममध्ये सिंधू आणि यिंग यांच्यात संघर्ष बघायला मिळाला. सिंधूने सुरुवातीला ६-३ ने आघाडी घेतली. यानंतर तिने स्कोअर १५-११ असा केला. सिंधूने २१-१५ ने गेम जिंकून अंतिम -८ मध्ये प्रवेश केला. दोन्ही खेळाडूंत हा सातवा सामना होता. यापूर्वीच्या सहा सामन्यांत सिंधूला केवळ २ मध्ये विजय मिळाला होता. वांगविरुद्ध सिंधूचा रेकॉर्ड २-४ असा आहे. सिंधूने वांगला अखेरीस २०१५ डेन्मार्क ओपनच्या क्वार्टर फायनलमध्ये मात दिली होती.

संघर्षानंतर के. श्रीकांत विजयी
अकरावा मानांिकत श्रीकांत आणि पाचवा मानांकित डेन्मार्कच्या जॉन जोर्गेनसन यांच्यात चांगली झुंज बघायला मिळाली. पहिल्या गेममध्ये श्रीकांत ११-९ ने पुढे होता. एक वेळा स्कोअर १७-१७ असा होता. यानंतर श्रीकांतने जोर्गेनसनला संधी दिली नाही आणि गेम २१-१९ ने जिंकला. दुसऱ्या गेममध्ये ११-११ च्या स्काेअरनंतर जाेर्गेनसनने १५-१३ ने आघाडी घेतली होती. अखेरीस श्रीकांतने २१-१९ ने गेम आपल्या नावे केला.


बॉक्सिंगमध्‍ये भारताचे आव्‍हान संपले
> रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत बॉक्सिंगमध्ये भारताचे आव्हान संपुष्टात आले आहे.
> 75 किलो वजनी गटात उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात भारताच्या विकास कृष्‍णनचा उझबेकिस्तानच्या बेकतीमीर मेलिकुझीव्हने पराभव केला.
> मेलिकुझीव्हने संपूर्ण सामन्यावर वर्चस्व राखत 3-0 असा एकतर्फी विजय मिळवला.
> विकासच्या पराभवाने भारताचे आव्हान संपुष्टात आले आहे.
> यापूर्वी 56 किलो वजनी गटात शिव थापा, 64 किलोमध्ये मनोज कुमार यांचा आधीच पराभव झाला होता.
ललिता बाबरचा प्रवास संपला...
> भारताची ललिता बाबरचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.
> 3000 मीटर स्टीपलचेसच्या शर्यतीत तिने जागतिक क्रमवारी दहावे स्‍थान पटकावले.
> विशेष म्‍हणजे 1984 नंतर म्‍हणजेच 32 वर्षानंतर स्टीपलचेच्‍या फायनलमध्ये मजल मारणारी ती एकमेव भारतीय महिला खेळाडू आहे.
> ललिताने ही रेस 9:22.74 मिनिटांत पूर्ण केली.
> या रेसचे गोल्ड मेडल बहरीनच्‍या रुथ जेबेटने जिंकले. केनियाची हाइवीनला रजत तर कांस्‍य पदक अमेरिकेच्‍या अॅमा कोबर्नला मिळाले.
अॅथलेटिक्समध्‍ये भारताला झटके
> अॅथलेटिक्सच्‍या 200 मीटर इव्‍हेंटमध्‍ये सरबानी नंदा पहिल्‍याच फेरीत बाहेर झाली. सरबानी आपल्‍या हीटमध्‍ये 6th नंबर राहिली. एकूण स्‍पर्धकात ती 55 व्‍या क्रमांकावर राहिली.
> दुसरीकडे पुरुषांच्‍या तिहेरी उडी गटातून रणजित माहेश्वरी क्वालिफिकेशन राउंडच्‍या पुढे जाऊ शकला नाही.
> रणजित आपल्‍या गटात 15 व्‍या तर एकूण 30 व्‍या स्‍थानी राहिला.
> पुरुष ग्रीको-रोमन 85 किलोग्राम रेसलिंगमध्‍ये रवींद्र खत्री राउंड ऑफ 16 मध्‍ये पराभूत झाला. त्‍यामुळे त्‍याचेही आव्‍हान संपले आहे. रवींद्रला हंगरीच्‍या विक्टर लोरिंक्जकडून 4-0 ने मात मिळाली.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, संबंधित फोटोज...
बातम्या आणखी आहेत...