आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फुटबॉलपटू रोनाल्डोने एजंटला लग्नात भेट दिले तब्बल 764 कोटींचे आयलॅंड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- रियाल मेड्रिडचा स्टार फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो याने एजंट जॉर्ज मेंडेस याच्या लग्नात ग्रीसमधील एक आयलॅंड भेट दिले. सांड्रा नावाच्या युवतीसोबत जॉर्जने रविवारी लग्न केले. तेव्हा रोनाल्डोने याची घोषणा केली. पोर्तुगीजमधील एका वेबसाईटने सांगितले आहे, की ग्रीसमधील हे आयलॅंड खुपच सुंदर आहे. याची किंमत €100m म्हणजेच 764 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे.
कोण आहे मेंडेस
पोर्तुगीज फुटबॉल टीमचा कर्णधार रोनाल्डो याचा जॉर्ज मेंडेस सुपर एजंट आहे. रोनाल्डो शिवाय चेल्सीचे मॅनेजर जोस मोरिन्हो, त्यांचा नवीन स्ट्रायकर राडेमल फाल्काओ आणि मॅनचेस्टर युनायटेडचा गोलकिपर डेव्हिड गिया यांचाही तो सल्लागार आहे.
स्पेनच्या एक वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, मेंडेस स्पेनमधील सर्वांत श्रीमंत व्यक्तींपैकी आहे. त्याच्याकडे अब्जावधी युरोंची संपत्ती आहे. गेल्या वर्षी मेंडेसने दिलेल्या सल्ल्यानुसार रोनाल्डोने अनेक करार केले होते. त्यातून त्याला 80 मिलियन डॉलरचे उत्पन्न मिळाले होते. फोर्ब्ज मासिकाने त्याला टॉप थ्री श्रीमंत खेळाडूंच्या यादीत स्थान दिले होते.
कमी किमतीला विकले जात आहेत ग्रीसचे आयलॅंड
आर्थिक विवंचनेत सापडलेला ग्रीस देश फारच कमी किमतीला आयलॅंड विकत आहे. 55 बिलियन यूरोचे (55 बिलियन डॉलर) कर्ज फेडण्यासाठी ग्रीस केवळ आयलॅंडच नव्हे तर टुरिस्ट स्पॉट, सरकारी इमारती, तलाव, पर्वत आदी विकत आहे. ग्रीसमध्ये अनेक आयलॅंड आहेत. सरकारने त्यांच्या विक्रीचा निर्णय घेतला आहे. यातील काही आयलॅंडची किंमत केवळ 21 कोटी रुपये आहे. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात ग्रीस सरकारने 20 आयलॅंड विक्रीला काढले होते.
पुढील स्लाईडवर बघा, गिफ्ट केलेले आयलॅंड आणि नवविवाहित कपलचे फोटो....