आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

90 डिग्रीचे 3000 फुट उंच डोंगर; 8 दिवसांत चढून केला विश्वविक्रम !

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कॅलिफोर्निया - चेक गणराज्यच्या अॅडम ऑन्ड्राने जगातील सर्वांत कठीण आणि उभी चढाई ८ दिवसांत पूर्ण करून िवश्वविक्रम केला आहे. अॅडमने योशेमिते नॅशनल पार्कच्या ३००० फुट उंच डोंगरावर १४ नोव्हेंबर रोजी क्लायबिंग सुरू केले. तो ९० डिग्रीच्या उंच डोंगरावर ८ दिवसांनी पोहोचला. अॅडमच्या आधी अमेरिकन क्लायंबर टॉमी क्लाडवेल आणि केविन जोर्गेेनसन यांनी मागच्या वर्षी जानेवारीत येथे क्लायबिंग केली होती. त्या दोघांनी हे काम १९ दिवसांत पूर्ण केले होते. अॅडम म्हणाला, ‘मी चमत्कार घडल्यासारखे वाटत आहे. हे काम मी विचार करत होतो, तेवढेच कठीण होते. ही माझी आतापर्यंतची सर्वांत उत्तम फ्री क्लायबिंग होती.'

फ्री क्लायबिंग
हे रॉक क्लायबिंगचे एक स्वरुप आहे. या अॅडव्हेंचर स्पोर्टस््धमध्ये क्लायबंरला कोणत्याही साहित्याच्या मदतीशिवाय दोरीच्या मदतीने डोंगरावर चढावे लागते. यात दोरीला बोल्टने बांधतात. मात्र, डोंगरावर बोल्ट ठोकण्यासाठी ड्रील मशिनचा उपयोग करता येत नाही. हातोड्याने हे बोल्ट डोंगरात ठोकून चढाई करावी लागते.
बातम्या आणखी आहेत...