आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लिएंडर पेस-रोहन बोपन्ना पराभूत, डेव्हिस कप, स्तेपानेक-पाव्लासेक विजयी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - लिएंडर पेस आणि रोहन बोपन्ना या अनुभवी भारतीय जोडीला चेक गणराज्यविरुद्ध महत्त्वपूर्ण दुहेरी लढतीत शनिवारी सलग सेटमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. त्यांना रांदेक स्तेपानेक आणि अॅडम पाव्लासेक जोडीने ७-५, ६-२, ६-२ अशा फरकाने पराभूत केले. या विजयासह चेक गणराज्यच्या संघाने २-१ ने आघाडी मिळवली. आता रविवारी होणाऱ्या रिव्हर्स एकेरी लढतीत सोमदेव देववर्मन आणि युकी भांबरीला विजय मिळवणे आवश्यक आहे. त्यांच्यावर आता विजयाचा दबाव वाढला आहे.

पराभूत झाल्यावर पेस आश्चर्यचकित होऊन भारतीय बेंचवर बसला, दुसरीकडे चेक गणराज्यच्या तंबूत संघ आनंद साजरा करत होता. पेस आणि बोपन्नावर विजयाचा दबाव होता, ज्यात ते अपयशी ठरले. त्यांच्यात समन्वयाचा अभाव स्पष्ट दिसून येत होता. दोघांनी अनेक वेळा चुका केल्या. त्यांचे रिटर्नदेखील नेटवर उसळत होते आणि कोर्टाच्या बाहेर जात होते. दोघांची सर्व्हिसदेखील खराब होती. पहिल्या सेटच्या दहाव्या गेममध्ये चेकच्या संघाची सर्व्हिस तोडून भारताने ५-५ ने बरोबरी केली होती. अकराव्या गेममध्ये पेस सर्व्हिस अपयशी ठरली.
चेकच्या संघाने १२ व्या गेममध्ये आपली सर्व्हिस कायम राखत पहिला सेट ५१ मिनिटांत ७-५ ने जिंकला. चेक गणराज्यच्या संघाने दुसऱ्या आणि तिसऱ्या सेटमध्ये शानदार सर्व्हिससह कोर्टचा सुंदर वापर करत दोन्ही सेट व समना जिंकला.
रिव्हर्स एकेरीचे सामने आज
पेस-बोपन्नाच्या पराभवानंतर भारताची आशा रविवारी होणाऱ्या रिव्हर्स एकेरीच्या सामन्यावर आहे. यात युकी भांबरीचा सामना जागतिक क्रमवारीत ४० व्या स्थानावर असलेल्या जिरी वेस्लीशी होईल. दुसऱ्या सामन्यात सोमदेवसमोर लुकास रोसोलचे आव्हान असेल.
रोहन बोपन्नासोबत जिंकणार पदक
देशातील सर्वात अनुभवी खेळाडू पेस दुहेरीतील पराभवानंतर भावुक झाला. त्यानंतर पेस म्हणाला, बोपन्नासोबत रिओ ऑलिम्पिकमध्ये निश्चित पदक जिंकू. सर्बियाविरुद्ध वर्षभरापूर्वी आम्ही दुहेरीचा सामना जिंकला होता. चेकविरुद्ध आम्ही विजयाचे दावेदार होतो. मात्र, प्रतिस्पर्धी खेळाडूंनी उत्कृष्ट प्रदर्शन केले. यात अॅडम पाव्लासेक चांगला खेळला.