आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डेव्हिस चषक: राफेल नदाल, डेव्हिड फेरर दिल्लीत खेळणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- भारत आणि स्पेनदरम्यान येत्या १६ ते १८ सप्टेंबरदरम्यान स्थानिक आर.के.खन्ना स्टेडियमवर डेव्हिस चषकाचे सामने होतील. स्पेनने डेव्हिस चषक विश्व ग्रुप प्लेऑफ सामन्यांसाठी आपल्या संघात राफेल नदाल आणि डेव्हिड फेररचा समावेश केला आहे.

इतर दोन खेळाडूंत फेलिसियानो लोपेज आणि मार्क लोपेज यांचा समावेश आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने नदाल आणि फेरर दिल्लीत खेळतील. स्पेनचे चारही खेळाडू रँकिंगच्या हिशेबाने भारतीय खेळाडूंच्या तुलनेत खूप पुढे आहेत.

१४ वेळेसचा ग्रँडस्लॅम विजेता नदाल विश्व रँकिंगमध्ये पाचव्या क्रमांकावर, तर फेरर १३ व्या स्थानी आहे. फेलिसियानो लोपेज एकेरीत १८ व्या तर दुहेरीत २१ व्या क्रमांकावर आहे. मार्क लोपेजची रँकिंग दुहेरीत १९ आहे.

दुसरीकडे भारतीय संघात सामील साकेत मिनेनी एकेरीच्या क्रमवारीत १४३ व्या तर रामकुमार रामनाथन २०२ व्या क्रमांकावर आहे. दुहेरीत रोहन बोपन्नाची क्रमवारी १७ तर लिएंडर पेसची ६२ आहे.

प्रथमच डे-नाइट लढती
दिल्लीतील डेव्हिस चषकाचे सामने सायंकाळी होतील. यंदा प्रथमच या लढती डे-नाइट अशा होतील. एकेरीचे सामने वाजता तर दुहेरीचे सामने वाजता होईल.
बातम्या आणखी आहेत...