आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डेव्हिस चषक : स्पेनकडून भारताचा धुव्वा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - जगातील माजी नंबर वन राफेल नदालसह डेव्हिड फेरर, लाेपेझसारख्या अव्वल खेळाडूंच्या बळावर स्पेन संघाने डेव्हिस चषकाच्या प्ले अाॅफ सामन्यात यजमान भारताचा धुव्वा उडवला. स्पेन संघाने ५-० ने शानदार विजयाची नाेंद केली. रविवारी भारताच्या सुमीत नागलने विजयासाठी दिलेली शर्थीची झंुज अपयशी ठरली. त्याला स्पेनच्या लाेपेझने धूळ चारली. त्यापाठाेपाठ रामनाथन रामकुमार पराभूत झाल्याने भारतावर ०-५ ने स्पेनकडून लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला.

रिअाे अाॅलिम्पिक अाणि फ्रेंच अाेपनमधील दुहेरीचा चॅम्पियन मार्क लाेपेझने पुुरुष एकेरीच्या लढतीत सुमीत नागलचा पराभव केला. त्याने ६-३, १-६, ६-३ अशा फरकाने सामना जिंकून स्पेनची ४-० ने अाघाडी निश्चित केली. यात सुमीतने दुसरा सेट जिंकून बराेबरी साधली. मात्र, त्यानंतर त्याला ही लय कायम ठेवता अाली नाही. कारण तिसऱ्या व निर्णायक सेटमध्ये लाेपेझने बाजी मारली.
फेररची रामकुमारवर मात : जागतिक क्रमवारीत १३ व्या स्थानावर असलेल्या डेव्हिड फेररने एकेरीच्या लढतीत रामकुमार रामनाथनवर मात केली. त्याने ६-२, ६-२ अशा फरकाने एकतर्फी विजय मिळवला.
बातम्या आणखी आहेत...