आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पॅरालिम्पिक : 56 वर्षांच्या इतिहासात पदक जिंकणारी दीपा ठरली भारताची पहिली महिला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रिअाे दि जानेरिअाे - भारताची महिला गोळाफेकपटू दीपा मलिकने रिओ पॅरालिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकले. पॅरालिम्पिकच्या ५६ वर्षांच्या इतिहासात पदक जिंकणारी दीपा भारताची पहिली महिला खेळाडू ठरली आहे. तिने गोळाफेकीत (एफ-५६) ४.६१ मीटरच्या अंतरावर गोळा फेकून पदक आपल्या नावे केले. एफ-५३ अशा गटात असे खेळाडू सहभागी होतात, ज्यांच्या हातात गोळा फेकण्याचे पूर्ण बळ असते मात्र, बोटे दुबळी असतात. शिवाय शरीराचा कमरेखालचा भागही दुबळा असतो. दीपा याच गटातील खेळाडू आहे. दीपाचे कुटुंंब २०१२ पर्यंत अहमदनगरला वास्तव्यास होते.

बहरिनच्या फातिमा नेेधमने ४.७६ मीटरसह सुवर्णपदक जिंकले. तिने दीपाच्या तुलनेत ०.१५ मीटर अधिक दूर गोळा फेकला. दीपाच्या पदकानंतर रिओ पॅरालिम्पिकमध्ये भारताची तीन पदके झाली असून, भारत ३५ व्या क्रमांकावर पोहोचला आहे. याआधी मरियप्पन थांगावेलूने उंच उडीत सुवर्णपदक तर वरुण भाटीने याच खेळात कांस्यपदक जिंकले आहे. दीपाच्या या कामगिरीमुळे हरियाणा सरकार ४ कोटी रुपये तर केंद्र सरकार ५० लाख रुपये देणार आहे. दीपाच्या कामगिरीनंतर देशभर तिचे कौतुक झाले.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, गोळाफेक, भालाफेक, थाळीफेकीत राष्ट्रीय विक्रम...
बातम्या आणखी आहेत...