आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कँसरने तिशीतीच अपंगत्‍व आलेल्‍या दीपा मलिकने 45 व्या वर्षी जिंकले गोल्‍ड मेडल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट््स डेस्क - भारताच्या दीपा मलिकने ब्राझीलमध्ये सुरू असलेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेत गोळाफेकीत रौप्यपदक जिंकून इतिहास घडवला. पॅरालिम्पिकमध्ये पदक जिंकणारी ती देशातील पहिली महिला खेळाडू बनली आहे. माझे हे रौप्यपदक देशातील अशक्त महिलांना समर्पित आहे, अशी प्रतिक्रिया विजयानंतर दीपाने व्यक्त केली. महाराष्ट्रातील अहमदनगर येथे अनेक वर्षे वास्तव्यास असलेली अपंग दीपा फक्त गोळाफेकीत नव्हे तर तब्बल पाच खेळ प्रकारांत तरबेज आहे. आपल्या अपंगत्वावर रडत बसण्यापेक्षा तिने आपल्या दुबळेपणाला शक्तिस्थान बनवले. कोणासमोरही हार मानली नाही. लढली.. पडली... पुन्हा उभी राहिली.. पुन्हा लढली... जिंकली..अशी तिची जिद्दीची कथा आहे.

४५ वर्षीय दीपा म्हणाली, ‘माझ्यासाठी आणि कुटुंबासाठी हा अभिमानाचा क्षण आहे. या पदकाचा उपयोग मी देशातील शारीरिकदृष्ट्या दुबळ्या महिलांच्या विकासासाठी करावा, असे मला वाटते.’ दीपाने ४.६१ मीटरच्या थ्रोसह एफ-५३ प्रकारात रौप्यपदक जिंकले होते.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, शरीरावर २०० च्या वर टाके... मुलगी आहे दिव्यांग...
अहमदनगर येथे अनेक वर्षे वास्तव्य
बातम्या आणखी आहेत...