आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मेंटेनन्सचा खर्च परवडत नसल्याने दीपा परत करणार BMW, सचिनने दिली होती लग्झरी कार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सचिनने दीपासह सिंधू, साक्षी आणि कोच गोपीचंद यांना BMW गाडी भेट दिली होती. - Divya Marathi
सचिनने दीपासह सिंधू, साक्षी आणि कोच गोपीचंद यांना BMW गाडी भेट दिली होती.
आगरतळा - भारताची अव्वल महिला जिम्नॅस्ट दीपा कर्माकरने रिओ ऑलिम्पिकमध्ये चौथे स्थान पटकावले होते. तिचे रिओतील पदक थोडक्याने हुकले. मात्र, तिच्या दमदार प्रदर्शनाची प्रशंसा देशभर झाली. भारतात परतल्यावर सचिन तेंडुलकरने पदकविजेती पी.व्ही. सिंधू आणि साक्षी मलिक यांच्यासोबत दीपा कर्माकरलाही बीएमडब्ल्यू कार भेट दिली होती. आता दीपा मलिक सचिनने भेट दिलेली ही बीएमडब्ल्यू परत करणार असल्याचे वृत्त एका संकेतस्थळाने दिले आहे.
रिओत दीपाचे कांस्यपदक थोडक्याने हुकले. मात्र, तिच्या दमदार प्रदर्शनाने आणि खेळातील कौशल्याने एक रात्रीत ती भारतात स्टार खेळाडू बनली. भारताने ऑलिम्पिकमध्ये दोनच पदके जिंकली. मात्र, सिंधू, साक्षी मलिकसह दीपानेही भारतीयांना अभिमान वाटावा अशी कामगिरी केली.

महागडी गाडी सांभाळणे हे खर्चिक काम आहे. अशा लक्झरी गाडीचा मेंटेनन्सही खूप असतो. इतकी महागडी गाडी सांभाळणे आपल्या ऐपतीबाहेर असल्याचे दीपाचे म्हणणे आहे. शिवाय मी आगरतळासारख्या छोट्या शहरात राहते. येथील रस्तेही छोटे आहेत. यामुळे मला आणि माझ्या कुटुंबीयांना ही गाडी सांभाळणे कठीण काम झाले आहे, असे दीपाचे म्हणणे आहे.
पुढे स्लाईडद्वारे पाहा, सचिन आणि दीपाने काय म्हटले होते ही कार भेट देताना....
बातम्या आणखी आहेत...