आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Defending Champion Saina Nehwal Storms Into China Open Final

सायना चायना ओेपनच्या फायनलमध्ये, किताब जिंकण्‍याची संधी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फुझोऊ- जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या सायना नेहवालला दुसऱ्यांदा चायना ओेपन बॅडमिंटन स्पर्धेचा किताब जिंकण्याची संधी आहे. तिने शनिवारी महिला एकेरीची फायनल गाठली.

गतविजेत्या सायनाने एकेरीच्या उपांत्य सामन्यात सातव्या मानांकित यिहान वांगचा पराभव केला. तिने २१-१३, २१-१८ ने एकतर्फी विजयाची नोंद केली. यासह तिने ४१ मिनिटांमध्ये अंतिम फेरीतील आपला प्रवेश निश्चित केला. अजिंक्यपदापासून एका पावलावर असलेल्या सायनाला आता फायनलमध्ये झुईरुईच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. सहाव्या मानांकित झुईरुईनेही अंतिम फेरीत धडक मारली.

वांगचा ४१ मिनिटांत पराभव
अव्वल मानांकित सायनाने आक्रमक खेळी करताना ४१ मिनिटांमध्ये एकतर्फी विजय साकारला. दरम्यान, चीनच्या वांगने दिलेली झुंज अपयशी ठरली. भारताच्या खेळाडूने सरस खेळी करून विजयश्री खेचून आणली.