आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Denmark Open: PV Sindhu Beats World Champion Carolina Marin To Enter Maiden Super Series Final

डेन्मार्क ओेपनमध्ये मरिनला नमवून सिंधूची फायनलमध्ये धडक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ओेडेन्से- जागतिक क्रमवारीत १३ व्या स्थानावर असलेल्या पी. व्ही. सिंधूने डेन्मार्क ओेपन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेची फायनल गाठली. तिने विजयी मोहीम अबाधित ठेवताना शनिवारी महिला एकेरीचा उपांत्य सामना जिंकला.

तिने अंतिम चारमध्ये ऑल इंग्लंड चॅम्पियन कॅरोलिना मरिनचा पराभव केला. तिने एक तास १५ मिनिटांत स्पेनच्या खेळाडूला धूळ चारली. सिंधूने २१-१५, १८-२१, २१-१७ अशा फरकाने शानदार विजयाची नोंद केली. यासह तिला अंतिम फेरीतील आपला प्रवेश निश्चित करता आला. आता तिला यंदाच्या सत्रात पहिला किताब आपल्या नावे करण्याची संधी आहे. यासाठी ती अवघ्या एका पावलावर आहे.

यिहानविरुद्ध विजय : तत्पूर्वी, सिंधूने उपांत्यपूर्व सामन्यात २०११ ची वर्ल्ड चॅम्पियन आणि २०१२ लंडन ऑलिम्पिकमधील रौप्यपदक विजेत्या यिहान वांगला सरळ दोन गेममध्ये धूळ चारली. भारताची युवा खेळाडू सिंधूने २१-१८, २१-१९ अशा फरकाने एकतर्फी विजयाची नोंद केली. याशिवाय तिने अवघ्या ४५ मिनिटांमध्ये अंतिम चारमधील आपला प्रवेश निश्चित केला. यासह बिगरमानांकित सिंधूने चीनच्या खेळाडूविरुद्धची आपली पराभवाची मालिका खंडित केली. तिने यंदाच्या सत्रातील सुरुवातीला यिहानचा पराभव केला.

शानदार खेळी करताना तिने पहिल्या गेममध्ये सहज बाजी मारली. यासह तिने लढतीमध्ये आघाडी मिळवली. दरम्यान, दुसऱ्या गेममध्ये चीनच्या यिहानने पुनरागमनाचा प्रयत्न केला. मात्र, तिला सिंधूला रोखता आले नाही. सिंधूने दुसरा गेमही जिंकून सामना आपल्या नावे केला होता.

सिंधूसमोर आता झुईरुई
महिला एकेरीची फायनल गाठणाऱ्या पी. सिंधूला आता विजेतेपदासाठी चौथ्या मानांकित ली झुईरुईच्या तगड्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. महिला एकेरीच्या फायनलमध्ये या दोन्ही अव्वल खेळाडू समोरासमोर असतील. चीनच्या या खेळाडूने उपांत्य सामन्यात सिंगचा २१-८, २०-२२, २१-१० ने पराभव केला.
बातम्या आणखी आहेत...