आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलीचे ‘ते’ बोल ठरले पदकासाठी प्रेरणादायी- भालाफेकपटू देवेंद्र झाझरीया

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलकाता- अॅथलिट्सना आपले सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करण्यासाठी कधी कुठले बोल प्रेरणादायी ठरतील हे सांगता येत नाही. रिओ पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक प्राप्त करणारा भालाफेकपटू देवेंद्र झाझरीया याने आपल्या सहा वर्षाच्या मुलीचे उद््गार आपल्यासाठी प्रेरणादायी बनल्याचे सांगितले आहे. त्याची मुलगी लहान गटात प्रथम आली आणि स्पर्धेपूर्वी मुलीने लावलेल्या पैजेप्रमाणे त्याला सुवर्णयश मिळवायचे होते. स्पर्धेपूर्वी मुलीने त्याला तशी आठवणही करून दिली होती. पित्यानेही आपल्या लाडक्या मुलीला दिलेला शब्द सुवर्ण पदक मिळवून खरा करून
दाखवला आहे.

काय होती पैज?
देवेंद्रची मुलगी जिया लहान गटात आहे. तिने अभ्यासात लक्ष्य द्यावे, यासाठी देवेंद्र आग्रही असायचा. पण जिया त्याला सुवर्णपदक मिळवण्याचा हट्ट धरायची. शेवटी या दोघांनी एक पैज लावली त्यात मुलीने लहान गटात प्रथम क्रमांक मिळवून दाखवावा आणि मग देवेंद्र सुवर्णपदक मिळवण्याचे ठरले. देवेंद्र रिओत असताना जियाने त्याला फोन केला आणि आपण पहिली आल्याचे सांगितले.

त्याचसोबत आता सुवर्णयश मिळवण्याची वेळ तुमची आहे, अशी अाठवणही करून दिली. तिचे हे उद््गार स्टेडियममध्ये पाय ठेवताच देवेंद्रच्या कानात घुमू लागले. मुलगी निराश होणार नाही याची काळजी त्याने घेतली. देवेंद्रने नुसतेच सुवर्णपदक मिळवले नाही तर नवा विश्वविक्रमही नोंदवला. ही माहिती देवेंद्रने यश मिळाल्यानंतर दिली.

रात्रभर झोपच नाही : सुवर्णयश मिळाल्यानंतर देवेंद्र स्वत: भारावला होता. तो रात्रभर झोपला नाही. पहाटे पाच वाजेपर्यंत तो कुटुंबीय व हितचिंतकांसोबत बोलत होता. आता कसली झोप. आज तर मी राष्ट्रध्वजासह आनंद साजरा करणार आहे. देवेंद्रने ६३.९० मिटर अशी कामगिरी नोंदवून सुवर्णपदक पटकावले.
देवेंद्रची खंत
आॅलिम्पिक स्पर्धेला जेवढे महत्त्व दिले जाते तेवढे पॅरालिम्पीक स्पर्धेला दिले जात नाही याची खंत देवेंद्रला वाटते. नॉर्मल अॅथलेटिक्स जेवढी मेहनत घेतात, तेवढीच मेहनत आम्हीही घेतो पण तुलनेत आम्हाला कमी प्रसिद्धी मिळते याचे देवेंद्रला दु:ख आहे. देवेंद्रला गोस्पोर्टस फाउंडेशनची मदतही मिळते.
कौतुकाचा वर्षाव
देवेंद्रला सुवर्णपदक मिळताच त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव सुरू झाला. पंतप्रधान मोदींपासून वीरेंद्र सहेवागपर्यंत सर्वांनी त्याच्या कामगिरीला सलाम केला. ऐतिहासिक कामगिरीबाबत देवेंद्र तुझे अभिनंदन तू यशास प्राप्त आहे. आम्हाला तुझा अभिमान आहे. असे टिव्ट मोंदींनी केले.
बातम्या आणखी आहेत...