आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Dhoni Did Not Say Any Good Word For 20 Minutes After Watching His Biopic

बायोपिक पाहताच धोनीची चुप्पी, काहीच रिअॅक्शन न दिल्याने सुशांत झाला शॉक्ड!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महेंद्रसिंग धोनीने आपली बायोपिक फिल्म लीड अॅक्टर सुशांत सिंग राजपूतसमवेत नुकतीच पाहिली. - Divya Marathi
महेंद्रसिंग धोनीने आपली बायोपिक फिल्म लीड अॅक्टर सुशांत सिंग राजपूतसमवेत नुकतीच पाहिली.
स्पोर्ट्स डेस्क- क्रिकेटर महेंद्रसिंग धोनीच्या आयुष्यावर आधारित बायोपिक फिल्म 'एमएस धोनीः द अनटोल्ड स्टोरी' 30 सप्टेंबर रोजी रिलीज होत आहे. ज्यात सुशांत सिंग राजपूतने धोनीची भूमिका केली आहे. फिल्म पूर्ण होताच सुशांत सिंगला याची उत्सुकता होती की धोनी ही फिल्म कधी पाहतोय आणि त्याची रिअॅक्शन काय असेल. आता सुशांतचा 'इंतजार' संपला आहे. मात्र, फिल्म पाहिल्यानंतर धोनीने जी रिअॅक्शन दिली त्यामुळे सुशांत शॉक्ड झाला. काही मिनिटे शांत शांत बसला धोनी...
- फिल्मबाबत धोनीने दिलेल्या रिअॅक्शनबाबत सुशांतने नुकतेच एका मुलाखतीत सांगितले.
- सुशांतने सांगितले की, 'धोनीने जेव्हा ही फिल्म पाहिली तेव्हा फिल्म पाहिल्यानंतर तो खूप काहीच बोलला नाही.'
- पुढे त्याने सांगितले की, ' सुमारे 20 मिनिटांपर्यंत धोनी शांत शांत बसला. तो फिल्मबाबत काहीच बोलला नाही. तो केवळ स्मितहास्य करीत होता.'
- सुशांत म्हणाला, जेव्हा मी धोनीला त्याच्या ट्रेनिंगचा एक व्हिडिओ दाखवला तेव्हा तो खुलला.
- सुशांतच्या म्हणण्यानुसार, यानंतर धोनीने सांगितले की, त्याला फिल्म खूपच आवडली. मात्र, फिल्म पाहिल्यानंतर भावनाविविश झाला होता. त्यामुळे तो शांत शांत बसला होता. कदाचित त्याला मागील 10-20 वर्षापूर्वीच्या घटना डोळ्यासमोर आल्या असतील.
- ही फिल्म आहे धोनीची बायोपिक मात्र, सुशांतच्या फिल्मी करियरसाठी सर्वात महत्त्वाची मानली जात आहे.
पुढे स्लाईड्समध्ये पाहा, फिल्म प्रमोशनदरम्यान कसे एकत्र आले धोनी आणि सुशांत...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...