आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Diego Maradona Vows To Stamp Out FIFA Corruption As Vice president

..तर उपाध्यक्षपदाच्या शर्यतीत : मॅराडोना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्यूनस आयर्स - जॉर्डनचे प्रिन्स अली बिन हुसेन यांची फिफाच्या अध्यक्षपदी निवड झाली तर मी उपाध्यक्षपदाच्या शर्यतीत िदसू शकतो, असे माजी दिग्गज फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना यांनी म्हटले आहे. मॅराडोना राजीनामा देणाऱ्या सॅप ब्लॅटरचे टीकाकार मानले जातात. गेल्या महिन्यात त्यांनी ब्लॅटर यांना हुकूमशहा संबोधले होते. अर्जेंटिनातील एका चॅनलला मुलाखत देताना मॅराडोनांनी म्हटले की,"प्रिन्स अली जिंकले तर मला उपाध्यक्षपदासाठी संधी उपलब्ध होऊ शकते. जर मी या पदावर आलो तर निश्चित सर्व वाद मिटवण्याचा प्रयत्न करीन.'