आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारतात कशाचीच कमी नाही : दीपा कर्माकर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रिओ - जिम्नॅस्टिक्सच्या इतिहासात प्रथमच भारतीय स्पर्धक अंतिम फेरीत खेळत होती. ही घटना रिओ जिम्नॅस्टिक्स स्टेडियमवर चवीने चर्चिली गेली. भारताच्या दीपा कर्मारकरने जेव्हा प्रोडुनोवा या रशियन जिम्नॅस्ट्सच्या नावाने प्रसिद्ध असलेला अतिशय कठीण असा व्हॉल्ट सादर केला, तेव्हा तमाम प्रेक्षक आणि परीक्षकही अचंबित झाले. १५.०६६ गुणांसह ती दुसऱ्या स्थानावर गेली होती. सर्व स्पर्धकांच्या कामगिरीनंतर जेव्हा तिचे कांस्यपदक हुकले, तेव्हा सर्वच देशांच्या चाहत्यांना हळहळ वाटली.

मात्र, या पराभवानंतरही हसतमुखाने पत्रकारांना सामोरी गेलेली दीपा म्हणाली, मी विश्वेश्वर नंदी या भारतीय प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली येथवर आले. एवढी उत्तम कामगिरी केली. सारे प्रशिक्षणही भारतातच घेतले. तेव्हा मला सर्वांना सांगायचे आहे की भारतातही चांगले कोच आहेत. येथे आलेल्या ९८ जणांचे परदेशी प्रशिक्षक होते, पण एका भारतीय गुरूकडून शिकलेली मी त्यामध्ये चौथी आले, ही अभिमानास्पद गोष्ट आहे. तेव्हा मी सांगू इच्छिते की, भारतीय कशातही कमी नाहीत. मी जर भारतातच प्रशिक्षण घेऊन एवढी चांगली कामगिरी करू शकते, तर इतर स्पर्धक का करू शकणार नाहीत? फक्त इच्छा हवी. मेहनत घेण्याची तयारी हवी, असे ती म्हणाली. माझे नाव लोक वेगवेगळ्या पद्धतीने उच्चारतात. मी त्रिपुराची, बंगाली कुटुंबातून आलेली मुलगी असून माझे नाव कर्माकर असे उच्चारावे, असेही तिने म्हटले. सराव फक्त गेले ३ महिने केला. मात्र, प्रशिक्षक नंदी यांनी त्याआधीच तयारी करून घेतली होती. देशवासीयांचे मी खूप आभार मानते. सर्वांनी माझ्यासाठी प्रार्थना केल्या. पदक थोडक्यात हुकले. मात्र, माझे लक्ष्य २०चे ऑलिम्पिक हे आहे, असे दीपा म्हणाली.
बातम्या आणखी आहेत...