आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑलिम्पिकमध्ये खेळणार अपंग खेळाडू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेलबर्न - ऑस्ट्रेलियाची पॅरालिम्पियन टेबल टेनिसपटू मेलिसा टेपरच्या जीवनातील सर्वात मोठे यश म्हणजे ती रिओ ऑलिम्पिकमध्ये सहभागी होत आहे. २६ वर्षीय मेलिसा लंडन पॅरालिम्पिकमध्ये सहभागी झाली होती. मात्र, या वेळी ती पॅरालिम्पिकशिवाय ऑलिम्पिकमध्येही सहभागी होईल. यंदाची ऑलिम्पिक स्पर्धा ऑगस्ट महिन्यात रिअो दी जानेरिओ येथे होणार आहे, तर पॅरालिम्पिक स्पर्धा सप्टेंबरमध्ये रिओतच होईल. ऑस्ट्रेलियाची एखादी पॅरालिम्पिक खेळाडू ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्याची ही पहिलीच वेळ असेल. मेलिसाने ऑलिम्पिक क्वालिफिकेशन स्पर्धेत सहभागी होऊन ऑस्ट्रेलियाच्या माजी चॅम्पियन खेळाडूला पराभूत करून रिओचे तिकीट मिळवले. मेलिसाने ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेत सामान्य गटात सहभागी होऊन कांस्यपदक जिंकले होते.

मेलिसा जन्माने अपंग आहे. जन्माच्या वेळी ती आईच्या गर्भात अडकली होती. डाॅक्टरांनी तिचा एक हात पकडून बाहेर ओढले. यात तिचा उजवा हात आणि खांद्याची नस खेचली गेली. यामुळे तिला अर्ब्स पाल्सी नावाचा आजार जडला. याचा अर्थ ती तिच्या उजव्या हाताचा प्रयोग केवळ ३० टक्केच करू शकते. तिने वयाच्या आठव्या वर्षापासूनच टेबल टेनिस खेळण्यास सुरुवात केली. वयाच्या १४ व्या वर्षी तिने ऑस्ट्रेलियाच्या ज्युनियर संघात स्थान मिळवले. ती १८ वर्षांची होती तेव्हा ती ऑस्ट्रेलियाची आघाडीची ज्युनियर खेळाडू बनली होती. मेलिसा म्हणते, "मी बालपणी सामान्य जीवन जगले. आम्ही तिघे भाऊ-बहीण आहोत. माझ्या आई-वडिलांनी कधीच भेदभाव केला नाही. मी अपंग असल्यामुळे माझ्यासोबत वेगळा व्यवहार होत असल्याचे त्यांनी मला कधीच जाणवू दिले नाही. मी स्वत:ला सामान्यच समजते. मी जशी आहे तशीच ठीक आहे. माझे भाऊ-बहीणसुद्धा माझ्यासोबत टेबल टेनिस खेळतात. आम्ही तिघे साेबतच खेळलो होतो. सुरुवातीला मी एक-दोन स्पर्धा खेळले अन् हरले. नंतर मी स्वत:ला प्रेरित करीत असे. हळूहळू सकारात्मकता वाढली आणि मी जिंकण्यास सुरुवात केली. ऑलिम्पिक जिंकणे कठीण आहे हे मला माहिती आहे. यामुळे माझे लक्ष्य जिंकण्यापेक्षा शिकण्यावर अधिक असते.'
छायाचित्र: मेलिसाने चार वेळच्या ऑलिम्पियनला हरवून रिओचे तिकीट मिळवले.
बातम्या आणखी आहेत...