चंदिगड- बेल्जियमचा कर्णधार अाणि अाॅलिम्पिकमधील राैप्यपदक विजेता हाॅकीपटू जाॅन डाेहमेन यंदा प्रतिष्ठेच्या ‘प्लेअर अाॅफ इयर’ पुरस्काराचा मानकरी ठरला. दुसरीकडे हाॅलंडच्या स्टार नाअाेमी वॅनला महिला गटामध्ये हा पुरस्कार मिळाला. अांतरराष्ट्रीय हाॅकी महासंघाच्या (एफअायएच) वतीने या पुरस्काराची घाेषणा करण्यात अाली.
भारतामध्ये प्रथमच या पुरस्कार जाहीर करण्यात अाले. मात्र, भारताचा एकही खेळाडू पुरस्कारासाठी पात्र ठरला नाही. रिअाे अाॅलिम्पिकमध्ये इंग्लंडला सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या मॅडी हिंचची सर्वाेत्कृष्ट महिला गाेलरक्षक पुरस्कारासाठी निवड झाली. तिने फायनलमध्ये हाॅलंडविरुद्ध शूटअाऊटमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली.
‘अाम्हाला सर्व पुरस्कार विजेत्या खेळाडूंचा अभिमान अाहे. भारतामधील हे अायाेजन अत्यंत यशस्वी ठरले अाहे. अाम्ही हाॅकीसाठी कमी काम केले अाहे. मात्र, अाता अागामी काळात हाॅकीला चालना देण्यासाठी युद्धपातळीवर काम करणार अाहे,’ अशी प्रतिक्रिया महासंघाचे अध्यक्ष नरेंद्र बत्रा यांनी दिली.
पुरस्कार विजेते : सर्वाेत्कृष्ट खेळाडू (पुरुष/महिला) : जाॅन डाेहमेन (बेल्जियम), नाअाेमी वॅन (हाॅलंड) , सर्वाेत्कृष्ट गाेलरक्षक (पुरुष/महिला) : हार्थ (अायर्लंड), मॅडी हिंच (इंग्लंड), रायझिंग स्टार अाॅफ द इयर (पुरुष/महिला) : अाॅर्थर (बेल्जियम), मारिया (अर्जेंटिना).