नवी दिल्ली- WWE चा स्टार रेसलर डोल्फ जिग्लर आणि दिवा चॅम्पियन चार्लोटने गुरुवारी क्रिकेटर वीरेंद्र सेहवागची भेट घेतली. हे दोघे सेहवागच्या मुलासोबत क्रिकेटही खेळले. सेहवागची मुले वेदांत आणि आर्यवीर यांनी अंडरटेकरचा सावत्र भाऊ मास्टर केनसह फोटो सेशनही केले.
भारत दौऱ्यावर WWE स्टार्स...
WWE सुपरस्टार्स दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर होते. ते येथील दिल्लीच्या इंदिरा गांधी इंडोर मैदानावरील इव्हेंट्समध्ये भाग घेण्यासाठी आले होते. येथील रेसलर्समध्ये वर्ल्ड हेवीवेट चॅम्पियन रोमन रेगंस आणि बिग शॉ यांच्यासारख्या दिग्गजांनीही भाग घेतला होता.
पुढील स्लाइड्सवर पाहा, सेहवागच्या मुलांसोबत क्रिकेट खेळताना रेसलर्सचे खास PHOTOS...