आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुबई ड्यूटी फ्री टेनिस; बाेपन्ना फायनलमध्ये, पेसचा पराभव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दुबई - भारताचा अव्वल खेळाडू राेहन बाेपन्नाला अाता सत्रामध्ये पुरुष दुहेरीचा किताब जिंकण्याची संधी अाहे. या विजेतेपदापासून ताे अवघ्या एका पावलावर अाहे. त्याने अापला सहकारी मार्सिन मात्काेवास्कीसाेबत शुक्रवारी दुबई ड्यूटी फ्री टेनिस स्पर्धेच्या फायनलमध्ये धडक मारली. 
 
या बिगर मानांकित जाेडीने पुरुष दुहेरीच्या उपांत्य सामन्यामध्ये भारताच्या अनुभवी टेनिस स्टार लिएंडर पेस अाणि गुल्लेर्माे गार्सिया लाेपेजवर मात केली. बाेपन्ना-मात्काेवास्कीने ६-३, ३-६, १०-६ अशा फरकाने राेमहर्षक विजयाची नाेंद केली. या विजयाच्या बळावर त्यांनी अंतिम फेरी गाठली. पराभवामुळे पेसला स्पर्धेतून बाहेर पडावे लागले.  
 
मरे उपांत्‍य फेरीमध्ये 
जगातील नंबर वन अँडी मरेने पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीतील अापला प्रवेश निश्चित केला. त्याने उपांत्यपूर्व सामन्यात जर्मनीच्या फिलीप काेलेश्वेबरचा पराभव केला. त्याने ६-७, ७-६, ६-१ अशा फरकाने सामना जिंकला. मरेचा  सामना अाता लुकास पाेईलीशी हाेणार अाहे.
बातम्या आणखी आहेत...