आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गरिबीमुळे खेळाडूंना करावी लागते हमाली! ज्युदाेपटूंची अार्थिक परिस्थिती हलाखीची

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीकरणपूर (श्रीगंगानगर) - या गाेष्टीवर विश्वास ठेवणेच तुमच्यासाठी अशक्यप्राय अाहे. मात्र, श्रीकरणपूर गावातील तीन राष्ट्रीय पदक विजेते ज्युदाेपटूंना हलाखीच्या अार्थिक परिस्थितीमुळे चक्क धान्य बाजारात हमालीचे काम करावे लागत अाहे. दहावीचा विद्यार्थी हरजितसिंग, तरसेमपालसिंग अाणि गुरविंदरसिंगने राष्ट्रीय ज्युदाे स्पर्धांमध्ये अनेक पदके जिंकली अाहेत. यात सुवर्णपदकांचाही समावेश अाहे. मात्र, या तिघांच्याही घरची अार्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची अाहे. मात्र, खेळाची प्रचंड अावड असलेल्या या तिघांमधील जिद्दही वाखाणण्याजाेगी अाहे. हे तिघेही दिवसभर धान्य बाजार अाणि गाेदामात पाेती उचलण्याचे काम करतात. त्यानंतर संध्याकाळी फावल्या वेळेत ज्युदाेचा सराव करतात. डाॅ. शेरसिंग हे या तिघांनीही माेफत प्रशिक्षण देतात.
तरसेमपालसिंग | ७ वेळा राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी, ७१ किलाे वजन गटात कांस्यपदकही जिंकले अाहे.
हरजितसिंग | २०१४-१५ च्या राष्ट्रीय ज्युनियर स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता खेळाडू. ८ वेळी राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग.
गुरविंदरसिंग | २०११-१२ मध्ये उज्जैन येथील राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग अाणि पदक जिंकले.
बातम्या आणखी आहेत...