आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुती चंद : 11.30 सेकंदांच्या वेळेसह रिओ ऑलिम्पिकला पात्र

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - राष्ट्रीय चॅम्पियन दुती चंदने १०० मीटर शर्यतीत रिओ ऑलिम्पिचके तिकीट मिळवले आहे. दुतीने अलमाटी (कजाकिस्तान) येथे झालेल्या २६ व्या इंटरनॅशन जी कोसानोव मेमोरिअल चॅम्पियनशिपमध्ये ११.३० सेकंदांचा वेळ काढून रिओ ऑलिम्पिकसाठी आपले स्थान पक्के केले. दुती चंदसाठी हे यश अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. कारण, २०१४ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या ऐन तोंडावर तिला पुरुष असल्याचा आरोपामुळे स्पर्धेबाहेर करण्यात आले होते. दुतीच्या या शानदार कामगिरीने तिच्या टीकाकारांना जोरदार उत्तर दिले आहे.

पीटी उषानंतर दुसरी अॅथलिट : महिलांच्या १०० मीटर धावण्याच्या शर्यतीमध्ये रिओ ऑलिम्पिक क्वालिफाय करण्यासाठी ११.३२ सेकंदांचा वेळ ठरवण्यात आला होता. दुतीने ०.०२ सेकंद कमी वेळ घेऊन हे अंतर पूर्ण केले. या कामगिरीसह तिने राष्ट्रीय विक्रमही प्रस्थापित केला. या दमदार प्रदर्शनाने िरओने ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळवले. दुतीचे यश देशाला आनंद देणारे असे आहे. तिच्या आधी १९८० मध्ये पीटी उषाने १०० मीटर धावण्याच्या शर्यतीत ऑलिम्पिकची पात्रता मिळवली होती. पीटी उषानंतर हे यश मिळवणारी दुती दुसरी भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. दिल्लीत आयोजित फेडरेशन चषकात दुती अवघ्या ०.०१ सेकंदाने रिओ ऑलिम्पिक क्वालिफाय करण्यापासून हुकली होती. मात्र, कजाकिस्तानच्या स्पर्धेत दुतीने हे अपयश मागे टाकत ऑलिम्पिक तिकीट मिळवलेच. दुतीने यावर्षीच रचिता मिस्त्रीचा १६ वर्षे जुना राष्ट्रीय विक्रम मोडला होता. आता तिने आपल्याच विक्रमात सुधारणा केली आहे.
हायपरअँड्रोजेनिझममुळे आयएएएफने केली होती बंदी

२०१४ मध्ये दुती हायपरअँड्रोजेनिझमची बळी ठरली होती. वैद्यकीय भाषेत ज्या वेळी शरीरात अँड्रोजन हार्मोन्सचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढते, तेव्हाची ही स्थिती आहे. हा हार्मोनच माणसांत पुरुष असलेले गुण विकसित करण्यासासाठी कारणीभूत असतो. अँड्रोजन हार्मोन टेस्टोस्टेरॉन सर्वात सामान्य आहे. हे हार्मोन दुतीच्या शरीरात मोठ्या प्रमाणावर आढळले होते. यानंतर आयएएएफने ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या आधी तिच्यावर बंदी घातली होती. या बंदीनंतर दुतीने घाबरून न जाता, बंदीच्या निर्णयाविरुद्ध लढण्याचा निर्धार केला. नंतर निकाल बदलून तिच्या बाजूने लागलासुद्धा.

सीएएसकडून मिळाला न्याय
दुतीने बंदीविरुद्ध कोर्ट ऑफ आरब्रिट्रेशन ऑफ स्पोर्ट््स (सीएएस) कडे दाद मागितली. सीएएसने म्हटले, “हार्मोनच्या कारणामुळे एखाद्या महिलेत सामान्य प्रमाणापेक्षा अधिक मात्रेत टेस्टोस्टेरॉन तयार होतात. अशात तिला पुरुष म्हणणे चुकीचे आहे. आयएएफने महिलांसाठी टेस्टोस्टेरॉनची पातळी ठरवली पाहिजे. भविष्यात आयएएफने दुतीविरुद्ध आणखी नवे पुरावे दिले नाही तर त्यांना आपला निर्णय बदलावा लागेल.’ यानंतर दुतीचे ट्रॅकवर पुनरागमन झाले. रिओ ऑलिम्पिकची पात्रता गाठणे, हे मुख्य लक्ष असल्याचे दुतीने तेव्हाच म्हटले होते.
बातम्या आणखी आहेत...