आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Edge 7th Time Champion Of World Heavyweight Championship

हा आहे WWE चा \'मनी इन द बॅंक\', याच्या समोर अंडरटेकरही पडतो ढिला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एज - Divya Marathi
एज
या रेसलरने एकूण 11 वेळा वर्ल्ड चॅम्पियनिशिप्स आणि 14 वेळा वर्ल्ड टॅग टीम चॅम्पियनिशप जिंकली आहे. होय, आपण बोलत आहोत रेसलिंग वर्ल्डचा 'मनी इन द बॅंक' म्हणजेच ऐजच्या संदर्भात. विक्रमी 7 वेळा वर्ड हेवीवेट चॅम्पियनशिप टायटल जिंकणारा तो एकमेव रेसलर आहे. याच्यानंतर क्रमाक लागतो तो ट्रिपल-एचचा. एच एकूण 5 वेळा वर्ल्ड हेवीवेट चॅम्पियन ठरला आहे. तर सर्वाधीक धोकादायक रेसलर डेडमॅन म्हणजेच अंडरटेकर. याने केवळ तीनवेळाच टायटल जिंकले आहे. ऐज त्याच्या चाहत्यांमध्ये मनी इन द बॅंक नावाने प्रसिद्ध आहे. त्याचे खरेनाव आहे 'अॅडम जोसेफ कॉपलंड'. सध्या WWE चा रॉ इव्हेंट सुरू आहे. नुकत्याच एका फाइटदरम्यान डोल्फ जिग्लरने एजला त्याच्या पसंतीच्या रेसलर्समध्ये सामील केले होते.
1992 मध्ये धडाकेबाज डेब्यू
ऐज अशा काही निवडक रेसलर्समध्ये गणला जातो, ज्याने पहिल्याच फाइटमध्ये सर्वांना आकर्शित केले. 1992 मध्ये ऐज याने ग्रेट लॅक्स आणि टोनी कॉन्डेलोसह अनेक स्टार रेसलर्सला धुळ चारली आहे. यानंतर तर ऐज दिग्गज रेसलरमध्ये गणल्याजाऊलागला. ऐजने त्याच्या करिअरमध्ये ट्रिपल-एच, शॉन मायकल, जॉन सीना आणि अंडरटेकर सारख्या दिग्गजांनाही रिंगमध्ये धूळ चारली आहे.
नाही मिळाले खरे प्रेम
WWE इतिहासात सर्वात यशस्वी रेसलर्सपैकी ऐज एक आहे. मात्र तो रियल लाइफमध्ये अयशस्वी ठरला. त्याने दोन वेळा लग्न केले मात्र त्याला या दोघींपासूनही वेगळे व्हावे लागले. त्याचा पहिला विवाह 2001 मध्ये अॅलानाह मॉर्लेबरोबर झाला. मात्र 2004 मध्ये हे दोघेही वेगळे झाले. यानंतर त्याने 2004 मध्ये लिसाबरोबर दुसरा विवाह केला. मात्र हा विवाहदेखील फार काळ टिकू शकला नाही. केवळ एकाच वर्षात हे कपल विभक्त झाले. सध्या ऐज WWE ची माजी वुमन रेसलर बेथ फोनिक्ससह लिव इन रिलेशनशिपमध्ये राहतो.
या सिनेमात केले आहे काम
1999 : Beyond the Mat
2000 : Highlander: Endgame
2012 : Bending the Rules
2015 : Interrogation

पुढील स्लाइड्सवर पाहा, द ऐजच्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाइफचे काही फोटो...