आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अॅपद्वारे ‘कॅरम’ जगभरात पोहोचवण्याचे प्रयत्न!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - कामगार वस्तीत आणि गिरणगावात एकेकाळी खेळला जाणारा ‘कॅरम’ हा भारतीय खेळ जगभरात पोहोचतोय. राज्य कॅरम संघटना,  माजी राष्ट्रीय कॅरम चॅम्पियन अरुण केदार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने गल्लीतली स्पर्धा पृथ्वीतलावरच्या कोणत्याही देशात ज्ञात करण्याची सोय केली आहे. राज्य कॅरम संघटनेच्या संकेतस्थळावर या सर्व घडामोडींचे निकाल आणि व्हिडिओ उपलब्ध आहेत. 
 
कॅरमच्या इतिहासापासून माजी विजेत्यांपर्यंत आणि पदाधिकाऱ्यांपासून पंचांपर्यंतचा संपूर्ण तपशील संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्यापुढचे पाऊल म्हणून लवकरच आंतरराष्ट्रीय स्तरावरचे एक ‘अॅप’ सुरू होत आहे. ‘कॅरमग्रीप’ या नावाने सुरू होणाऱ्या या अॅपच्या माध्यमातून भारताच्या या एेतिहासिक खेळाचा झेंडा चक्क पृथ्वीवरच्या प्रत्येक देशात फडकणार आहे. 
  
भारतातील कोणत्याही छोट्या ठिकाणची स्पर्धादेखील प्रत्यक्षात अनुभवता येणार आहे. म्हणजे युरोप, ऑस्ट्रेलिया, अमेरिकेतही कॅरमची आवड असणाऱ्या व्यक्तीला स्पर्धेचा सामना, गुणफलक पाहता येणार आहे. एखादी ब्रेक टू फिनिशसारखी सर्वोत्तम कामगिरी व्हिडिअोद्वारे थेट पाहता येणार आहे. विशिष्ट पद्धतीचा स्ट्रोक, ग्रीप, डावपेच आदी अनुभवता येणार आहेत, शिकता येणार आहेत.   

कॅरम ऑनलाइनसारखे ‘अॅप’ ही भविष्यकाळात सुरू होणार आहेत. बुद्धिबळाच्या धर्तीवर खेळाची माहिती सर्वसामान्यांना थेट देणे हा त्यापाठचा हेतू आहे.   

कॅरम या खेळाची प्रेक्षकसंख्या अफाट असली तरी प्रत्यक्ष पाहणाऱ्या प्रेक्षकसंख्येला मर्यादा आहे. त्यावर मात करण्यासाठी आता मोठ्या स्क्रीनवर या खेळाचे थेट प्रक्षेपण करून अधिक रसिकांना या खेळाचा आनंद लुटण्याची संधी उपलब्ध झाली आहे.   भारतात घराघरात पोहोचलेल्या या खेळाला अत्याधुनिक करण्यासाठी आता तंत्रज्ञानही मदतीसाठी पुढे सरसावले आहे. 
बातम्या आणखी आहेत...