आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बरेच ऑलिम्पिक विजेते; वर्ल्ड चॅॅम्पियन असलेले दिग्गजही रिओला क्वालिफाय करण्यात अपयशी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - रिओ ऑलिम्पिकचे काउंटडाऊन सुरू झाले आहे. ही स्पर्धा जसजशी जवळ येत आहे, तसतसा दिग्गज खेळाडूंच्या झुंजी पाहण्याचा उत्साह वाढत आहे. असे असले तरीही या वेळी असे बरेच दिग्गज खेळाडू आहेत, जे माजी ऑलिम्पिक चॅॅम्पियन, वर्ल्ड चॅम्पियन असून रिओमध्ये दिसणार नाहीत. रिओला क्वािलफाय करता न आलेल्या दिग्गज चॅम्पियन खेळाडूंची यादी भलीमोठी आहे. यात काही भारतीय खेळाडूसुद्धा सामील आहेत. जूनपर्यंत बऱ्याच खेळांच्या क्वालिफायर स्पर्धा संपल्या अाहेत. काही खेळांच्या पात्रता स्पर्धा जुलैच्या पहिल्या आठवड्यात संपतील.

भारताचे चार ऑलिम्पिक पदक विजेता खेळाडू रिओत दिसणार नाहीत, तर जगातले १० दिग्गज खेळाडू ७ संघांना रिओला क्वालिफाय करता आले नाही. भारतीय महिला बॉक्सर एम.सी.मेरिकॉम, विजेंद्रसिंग, कुस्तीपटू सुशीलकुमार आणि नेमबाज विजय कुमार या वेळी ऑलिम्पिकमध्ये नसतील. याशिवाय टेनिसपटू लिएंडर पेसच्या ऑलिम्पिक सहभागावर अद्याप प्रश्नचिन्ह कायम आहे. विजेंद्रला क्वालिफाइंगची संधी मिळू शकते. मात्र, त्याने क्वालिफायरमध्ये सहभागी होण्यास नकार दिला. तिकडे सुशीलकुमारही खेळू शकणार नाही.
पुढे वाचा..
बातम्या आणखी आहेत...