आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युराे कप : रशिया-इंग्लंड सामना ड्रॉ; समर्थकांमध्‍ये मारहाण, 19 जखमी, 1 गंभीर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मार्सिली (फ्रान्स) - स्टॉपेज टाइममध्ये रशियाचा कर्णधार वॅसिली बेेरेजुस्कीने केलेल्या शानदार गोलच्या बळावर रशियाने इंग्लंडसोबतचा सामना १-१ ने बरोबरीत सोडवला. युरो चषकाच्या इतर एका सामन्यात वेल्ने स्लोव्हाकियाला २-१ ने हरवले. रशिया-इंग्लंड सामन्यात रशियन कर्णधार वेरेजुस्कीने गोल करताच स्टेडियममध्ये दोन्ही संघांच्या प्रेक्षकांत हाणामारी सुरू झाली. नाराज झालेल्या लोकांनी स्टेडियममध्ये मोडतोड, जाळपोळ केली.

सामन्याच्या सुरुवातीपासून इंग्लंडने आपला दबदबा ठेवला. इंग्लंडकडून एरिक डिएरने फ्री किकवर सामन्याच्या ७३ व्या मिनिटाला गोल करून १-० अशी आघाडी मिळवून दिली.

असा झाला बरोबरीचा गोल
९० व्या मिनिटात कर्णधार बेरेजुस्कीने हेडरला डॅनी रोजच्या वरून मारताना गोलपोस्टमध्ये पोहोचवले. इंग्लिश गोलकीपर जो. हार्टला चकवत त्याने रशियाला बरोबरी मिळवून दिली.
सामन्यानंतर जाळपोळ : सामन्यानंतर प्रेक्षकांत हाणामारी झाली. स्टेडियमवर जाळपोळही करण्यात आली. लोकांनी एकमेकांवर बिअरच्या बाटल्या फेकल्या. प्रेक्षकांनी स्टेडियमच्या खुर्च्या मोडल्या. प्रेक्षकांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना अश्रुधूर सोडावा लागला.

कोहली युरो कपच्या रंगात बुडाला
नवी दिल्ली- टीम इंडियाचा कसोटी कर्णधार विराट कोहलीने िट्वटरवर आपली आवडती टीम जर्मनीचा टी-शर्ट घातलेला फोटो पोस्ट केला. कोहली म्हणाला, "मी युरो कप २०१६ साठी खूप उत्साहित आहे. मी या स्पर्धेत जर्मन टीमचे समर्थन करीत आहे.' फोटोत कोहलीने जर्मनीची जर्सी घातल्याचे दिसून येत असून त्यावर १८ नंबर लिहिलेला आहे.

अमेरिका अंतिम आठमध्ये
पेराग्वेला १-० ने पराभूतकरून अमेरिकाने स्पर्धेच्या क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला आहे. सामन्याच्या २७ व्या मिनिटाला डिंपसेने अमेरिकेसाठी गोल केला. दुसऱ्या एका लढतीत कोस्टारिकाने दमदार प्रदर्शन करणाऱ्या कोलंबियाला एका गोलने नमवले.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, सामन्‍याशी संबंधित फोटो..
बातम्या आणखी आहेत...