आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोहली, स्मिथच्या दर्जाचा फलंदाज बनायचे : जाे.रुट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - भारताचा कर्णधार विराट कोहली आणि ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ज्या स्तरावर पोहोचले आहेत, त्या स्तरापर्यंत इंग्लंडचा नवा कर्णधार जो. रुटला आपल्या फलंदाजीला न्यायचे आहे. अॅलेस्टर कुकच्या राजीनाम्यानंतर जो. रुटला इंग्लंडचा नवा कसोटी कर्णधार बनवण्यात आले. आतापर्यंत त्याने ५३ कसोटीत ५३ च्या सरासरीने धावा काढल्या आहेत. 
 
कोहली कर्णधार बनल्यानंतर त्याची सरासरी ६७ इतकी जबरदस्त आहे. यात तो सर्वांत पुढे आहे. रुट म्हणाला, “मला कोहली आणि स्टीव्हन स्मिथसारखे दमदार प्रदर्शन करायचे आहे. मी या दोघांकडून प्रेरित होऊन  फलंदाजी त्या स्तरापर्यंत उंचावू इच्छितो. प्रत्येक क्रिकेटपटूचे इंग्लंडचा कर्णधार बनण्याचे स्वप्न असते. ही संधी मला मिळाली आहे. यामुळे मला माझ्या प्रदर्शनाने मैदान गाजवायचे आहे.’ कर्णधार म्हणून तयार हाेण्यास आपल्याकडे पुरेसा वेळ आहे, असे रुटचे मत आहे. 
 
कसोटीत तिन्ही खेळाडू 
खेळाडू    सामने    धावा    १००    ५०  
विराट कोहली    ५४    ४४५१    १६    १४  
स्टीवन स्मिथ    ५०    ४७५२    १७    २०  
जो. रुट    ५३    ४५९४    ११    २७
बातम्या आणखी आहेत...